नागपूर - नागपुरात बिघडत चाललेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रास्त धान्य दुकानदार आक्रमक झाले आहे. अंगठा घेऊन रेशन देण्यासाठी पॉस मशीनचा उपयोग थांबवत थेट धान्य वाटपाची परवानगी मागितली आहे. अन्यथा जिल्ह्यातील रेशन वितरण थांबवू, असा इशाराच रेशन दुकानदार संघाने दिला आहे. यासाठी निवेदन देऊन 1 मेपर्यंत शासनाने निर्णय घेण्याची सूचना केली आहे.
नागपुरात जवळपास सहाशेच्या घरात धान्य वितरक आहे. यांनी कोरोनाच्या भीतीमुळे थम्ब (अंगठा) घेऊन दिले जाणारे धान्य वाटप थांबवले आहे. पॉस मशीन रेशन दुकानदार संघ कार्यालयात जमा केले आहे. यामुळे जर शासनाच्या वतीने निर्णय न घेतल्यास सर्व दुकानदार हे धान्य वितरण थांबवणार, असे संघाचे अध्यक्ष गुड्डू अग्रवाल यांनी दिला आहे. यामुळे या कोरोनाच्या परिस्थिती केव्हाही हा पुरवठा थांबून वितरण व्यवस्था कोलमडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- या आहेत मागण्या
- थेट धान्य वाटपाबाबत 1 मेपर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा धान्य वितरण थांबावू
- पॉस मशीनने धान्य वितरण करताना संक्रमणाचा धोका वाढला.
- मृत्यूच्या धोक्यामुळे विमा काढून देण्याचीही मागणी
हेही वाचा - नागपूर जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच राहतील सुरू