ETV Bharat / state

सुषमा स्वराज लवकरच नागपूरला येणार होत्या - प्रमिला मेंढे - राष्ट्र सेविका समिती

मातृत्त्वभाव काय असतो? हे सुषमा स्वराज यांच्याकडून शिकण्यासारखे होते. देवाने त्यांच्यासाठी दुसरे परराष्ट्र मंत्रालय बनवले असावे. म्हणूनच त्यांना बोलावून घेतले, अशी भावनिक प्रतिक्रिया राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिला मेंढे यांनी यावेळी दिली.

राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिला मेंढे
author img

By

Published : Aug 8, 2019, 8:06 AM IST

नागपूर - काश्मीरमधील कलम ३७० रद्द झाल्यावर सुषमा स्वराज आणि माझ्यामध्ये बोलणे झाले होते. लवकरच नागपूरला येणार असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. मात्र, त्यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला, अशा शब्दात राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिला मेंढे यांनी सुषमा स्वराज यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांना श्रद्धांजली वाहिली.

सुषमा स्वराज लवकरच नागपूरला येणार होत्या - प्रमिला मेंढे

सुषमा स्वराज या राष्ट्र सेविका समितीच्या आजन्म सद्स्य होत्या. त्यांनी संघाच्या अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांचे प्रमिला यांच्याशी जवळचे संबंध होते. त्यांच्याविषयी बोलताना प्रमिला म्हणाल्या, सुषमा स्वराज यांनी देशाच्या परराष्ट्र मंत्रालयात काम करताना परदेशात भारताची प्रतिमा उंचावली. त्यांची साधी राहणी उच्च विचारसरणी आजच्या राजकारणात पाहायला मिळत नाही. एवढ्या मोठ्या पदावर गेल्यानंतर देखील त्यांनी राष्ट्र सेविका समितीच्या नियमाचे सदैव पालन केले. एवढेच नाहीतर त्या सामान्य सेविकांप्रमाणे जमिनीवर बसत होत्या. त्यांनी पदाचा कधीही मोठेपणा दाखवला नाही. त्यांच्यातील मातृभाव सदैव स्मरणात राहणारा आहे.

मातृत्त्वभाव काय असतो? हे सुषमा स्वराज यांच्याकडून शिकण्यासारखे होते. त्यांनी विदेशातील अनेक भारतीयांना मदत केली. त्यांची कार्यशैली देश कधीही विसरू शकणार नाही. देवाने त्यांच्यासाठी दुसरे परराष्ट्र मंत्रालय बनवले असावे. म्हणूनच त्यांना बोलावून घेतले, अशी भावनिक प्रतिक्रिया प्रमिला यांनी यावेळी दिली.

Intro:देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे देश दुःख सागरात बुडालेला आहे...सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय...राष्ट्र सेविका समिती माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेंढे यांच्याशी सुषमा स्वराज यांचे ऋणानुबंध होते,त्यांच्या निधनाने प्रमिळताई यांना अतीव दुःख झाले आहे,यावेळी त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधी ने संपर्क केला असता त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला Body:सुषमा स्वराज या राष्ट्र सेविका समितीच्या आजन्म सदस्य होत्या....या आधी त्यांनी संघाच्या अनेक कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे...सुषमा स्वराज यांनी देशाच्या परराष्ट्र मंत्रालयात काम करताना विदेशात भारताची प्रतिमा उंचावली,त्यांची साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी आजच्या राजकारणात बघायला मिळत नाही .... इतक्या मोठ्या पदावर गेल्या नंतरही त्यांनी समितीच्या नियमांचं सदैव पालन केलय,एवढच नाही तर त्या सामान्य राष्ट्र सेविकांप्रमाणे जमिनीवर बसायच्या,त्यांनी कधीही पदाचा मोठेपणा दाखवलेला नाहीं, उलट त्यांच्यातील मातृभाव हा सदैव स्मरणात राहणार आहे...कलम 370 रद्द झालं त्या दिवशी प्रमिलाताई आणि सुषमा स्वराज यांच्यात बोलणं झालं होत,त्यावेळी त्यांनी लवकरच नागपूरला येणार असल्याचे कबूल केले असल्याचे त्यांनी सांगितले...देवाने स्वर्गात परराष्ट्र मंत्रालय बनविल असावा म्हणून त्यांना देवाने तिथे त्याना बोलून घेतलं असावे अशी भावनिक प्रतिक्रिया प्रमिलाताई मेंढे यांनी दिली आहे...मातृत्वभाव काय असतो हे त्यांच्या कडून शिकण्या सारख होत,अनेक भारतीयांना विदेशात त्यांनी मदत सुद्धा केली ही त्यांची कार्यशैली देश कधीही विसरु शकणार नही Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.