नागपूर - शिवसेना उपजिल्हाप्रमुखाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. मात्र, उपजिल्हाप्रमुख युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदित्य संवाद कार्यक्रमात कायद्याचा धाक नसल्यासारखे फिरताना दिसत आहे.
रजनीश पांडे उर्फ चिंटू महाराज असे या जिल्हा प्रमुखाचे नाव आहे. आरोपी चिंटू महाराजने स्वतःची टोळी तयार केली आहे. त्याद्वारे तो रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकची धरपकड करून ट्रकच्या मालकाला १ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी त्याच्याविरोधात मौदा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे शहरात येण्याच्या काही तासांपूर्वी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर मौदा पोलील त्यांना अटक करण्याच्या तयारीत होते. मात्र, ते अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही. त्यानंतर ते आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात फिरताना दिसले. आता चिंटू महाराजला अटक कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.