ETV Bharat / state

अधिवेशन संपण्यापूर्वी राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी - राणा दाम्पत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2023, 4:03 PM IST

Navneet Rana And Ravi Rana: महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन (Legislature Winter Session 2023) संपण्यापूर्वी राज्य सरकारने विदर्भातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार रवी राणा (Ravi Rana)आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. रवी राणा यांनी नागपूरात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नुकसान भरपाईची आग्रही मागणी करणारं पत्र दिलं. या निवेदनपत्रावर खासदार नवनीत राणा यांचीही स्वाक्षरी आहे.

Navneet Rana And Ravi Rana
आमदार रवी राणा यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेची भेट

नागपूर Navneet Rana And Ravi Rana : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला ( Legislature Winter Session 2023) उपराजधानी नागपुरात आजपासून सुरुवात झाली. त्यामुळं राज्यातील दिग्गज नेत्यांनी नागपुरात तळ ठोकला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, बेरोजगारी, महागाई, ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा तिढा आदी विषयांवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारला घेरलं. विरोधकांनी आक्रमक होत गळ्यात संत्र्यांच्या माळा घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करुन विधिमंडळ दणाणून सोडलं.

रवी राणा यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट : नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस नागपूर, अमरावती विभागातील सर्वच जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यात यावे अशी मागणी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana)यांनी केली आहे. ही मागणी करणारं पत्र रवी राणा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिलं.

हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी मदत करावी : अमरावती विभागात २७,२८ आणि २८ नोव्हेंबरला अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. त्यामध्ये कापूस सोयाबीन, तूर, गहू, हरभरा या पिकांसह फळ आणि भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. तसंच काही ठिकाणी पशुधनाची हानी झाली आहे. अनेक गावांमध्ये घरांचं नुकसानही झालं होतं. या सर्व नुकसानीसंदर्भात सरसकट पंचनामे करून हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी राणा दांपत्याने पत्रात केली आहे.

पुरवणी मागण्या सभागृहात सादर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी नागपूर इथं आज सुरू झालेल्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या आहेत. डिसेंबर 2023 च्या तृतीय (हिवाळी) अधिवेशनात तब्बल 55,520.77 कोटींच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर करण्यात येत आहेत. यापैकी 19,244.34 कोटींच्या अनिवार्य, 32,792.81 कोटींच्या कार्यक्रमांतर्गत तसंच 3,483.62 कोटींच्या रकमा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगानं या पुरवणी मागण्या आहेत. एकूण 55,520.77 कोटींच्या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा 48,384.66 कोटी इतका आहे.

हेही वाचा -

  1. Rana Couple Diwali : राणा दाम्पत्यांची दिव्यांगांसोबत दिवाळी साजरी; फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा
  2. Rana couple VS Yashomati Thakur: 'तू असशील गोरी आणि मी डोमडी'....पाहा, राणा दाम्पत्य आणि आमदार यशोमती ठाकूरमध्ये रंगलाय कलगीतुरा
  3. Dhikkar March Against MP Rana: राणा दाम्पत्य V/s आंबेडकरी संघटना; २ मे ला 'धिक्कार मोर्चा', जाणून घ्या काय घडले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.