ETV Bharat / state

Protest For Separate Vidarbha: 'असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही'; वेगळ्या विदर्भासाठी विदर्भावाद्यांचे आंदोलन

भारतीय जनता पक्षाने २०१४ साली सत्तेत आल्यास विदर्भ राज्याच्या निर्मितीचे (Separate Vidarbha state) जाहीर अभिवचन दिले होते. मात्र त्यानंतर हा विषय राजकीय सोयीसाठी मागे टाकण्यात आला.

Protest For Separate Vidarbha
Protest For Separate Vidarbha
author img

By

Published : Nov 11, 2022, 5:17 PM IST

नागपूर: वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी (Separate Vidarbha state) आज विदर्भ आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली विदर्भातील सर्व दहा खासदारांच्या घर आणि कार्यालयात बाहेर आंदोलन करून राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. (Protest For Separate Vidarbha). अनेक दशकांपासून अविरतपणे सुरू असलेली वेगळ्या विदर्भाच्या मागणीकडे राज्यकर्ते फार गंभीरपणे बघत नसल्यामुळे विदर्भवाद्यांनी लक्ष वेधण्यासाठी आता आरपारची लढाई लढण्याचा निर्धार केला आहे.

वेगळ्या विदर्भासाठी विदर्भावाद्यांचे आंदोलन

हा विषय राजकीय सोयीसाठी मागे टाकण्यात आला: भारतीय जनता पक्षाने २०१४ साली सत्तेत आल्यास विदर्भ राज्याच्या निर्मितीचे जाहीर अभिवचन दिले होते. मात्र त्यानंतर हा विषय राजकीय सोयीसाठी मागे टाकण्यात आला. त्यामुळे खासदार म्हणून खुर्चीत राहण्याचा अधिकार गमावला असल्याचा आरोप करत आज विदर्भावाद्यांनी खासदारांच्या घर आणि कार्यालयात जाऊन जाहीरपणे राजीनाम्याची मागणी केली आहे. निवडणूका आल्या की सर्वच राजकीय पक्षांना वेगवेगळ्या विदर्भाची आठवण आवर्जून होते. त्यामुळे विदर्भवाद्यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या १० खासदारांना विदर्भ राज्य निर्मिती बाबत त्यांची व त्यांच्या पक्षाची काय भूमिका आहे, याची विचारणा केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.