ETV Bharat / state

कैदी वर्षभरात दोन वेळा पळून जाण्यात यशस्वी - prisoners in nagpur

फसवणुकीसह इतर प्रकरणात सिजो चंद्रन हा नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात विचाराधीन कैदी आहे. आजारी असल्याने काही दिवसांपासून तो शासकीय मेडिकल रुग्णालयाच्या क्षयरोग वॉर्डात उपचार घेत होता.

कैदी वर्षभरात दोन वेळा पळून जाण्यात यशस्वी
author img

By

Published : May 16, 2020, 4:42 PM IST

नागपूर - शासकीय मेडिकल रुग्णालयात उपचार घेत असलेला कैदी पळून गेल्याची घटना नागपुरात घडली आहे. सिजो चंद्रन असे या पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. फसवणुकीसह इतर प्रकरणात सिजो चंद्रन हा नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात विचाराधीन कैदी आहे. आजारी असल्याने काही दिवसांपासून तो शासकीय मेडिकल रुग्णालयाच्या क्षयरोग वॉर्डात उपचार घेत होता.

शनिवारी पहाटे सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांची नजर चुकवून तो पळून गेला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फरार झालेला आरोपी चंद्रन चा शोध घेण्यास सुरवात केली आहे. यापूर्वी १९ जुलै २०१९ मध्ये देखील शासकीय मेडिकल रुग्णालयाच्या सुपर हॉस्पटिल मधून पळून गेला होता. त्यानंतर नागपूर पोलिसांनी तेलंगणा येथून त्याला अटक केली होती. एकाच कैदी वर्षभरात दोन वेळा पळून गेला असल्याने आश्चर्यदेखील व्यक्त केले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.