ETV Bharat / state

PM Narendra Modi Nagpur Visit : पंतप्रधान मोदी आणणार 'समृद्धी'; विविध विकासकामांचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्या हस्ते नागपूरात रविवारी 1 हजार 500 कोटींहून अधिक किमतीच्या राष्ट्रीय रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन ( Inauguration of National Railway Projects by Prime Minister Narendra Modi ) करण्यात येणार आहे. तसेच नागपूर ते शिर्डीला जोडणाऱ्या 520 किलोमीटर अंतराच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान ( Inauguration of Samriddhi Highway by Narendra Modi ) करणार आहेत.

Narendra Modi
Narendra Modi
author img

By

Published : Dec 10, 2022, 10:53 PM IST

Updated : Dec 11, 2022, 10:12 AM IST

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) 11 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र तसेच गोव्याला भेट देणार आहेत. सकाळी 9.30 वाजता पंतप्रधान नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचले. तिथे त्यांनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा ( Green flag for Vande Bharat Express ) दाखविला. सकाळी 10 वाजता पंतप्रधान फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन ते खापरी मेट्रो स्टेशन पर्यंत मेट्रो राईड घेतील. जिथे ते ‘नागपूर मेट्रो फेज I’ राष्ट्राला समर्पित करतील. या कार्यक्रमादरम्यान ते ‘नागपूर मेट्रो फेज-२’ ची पायाभरणीही करतील. सकाळी 10:45 च्या सुमारास पंतप्रधान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डीला जोडणाऱ्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. तसेच सकाळी 11.15 वाजता पंतप्रधान एम्स नागपूर राष्ट्राला समर्पित करतील.

रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण - पंतप्रधान नागपुरातील एका सार्वजनिक कार्यक्रमात, सकाळी 11:30 वाजता, विविध विकास कामांची पायाभरणी करतील. तसेच 1 हजार 500 कोटींहून अधिक किमतीच्या राष्ट्रीय रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण करतील. ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थ (NIO), नागपूर, नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प, नागपूरची पायाभरणीही करतील. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (सीआयपीईटी), चंद्रपूर’ राष्ट्राला समर्पित करतील. तसेच ‘सेंटर फॉर रिसर्च, मॅनेजमेंट अँड कंट्रोल ऑफ हिमोग्लोबिनोपॅथी, चंद्रपूर’ चे उद्घाटन त्याच्या हस्ते होईल.

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन - त्यानंतर मोदी दुपारी 3.15 वाजता गोव्यात पोहचतील तिथे ते 9व्या जागतिक आयुर्वेद काँग्रेसच्या समापन समारंभाला संबोधित करतील. या कार्यक्रमादरम्यान ते तीन राष्ट्रीय आयुष संस्थांचे उद्घाटनही करतील. संध्याकाळी 5:15 वाजता पंतप्रधान, गोवा येथील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील.

नागपूर ते शिर्डीला जोडणाऱ्या 520 किलोमीटर अंतराच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे मोदींच्या हस्ते उद्घाटन

समृद्धी महामार्ग - नागपूर ते शिर्डीला जोडणाऱ्या 520 किलोमीटर अंतराच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. समृद्धी महामार्ग, नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे प्रकल्प, हे पंतप्रधानांच्या सुधारित कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधांच्या देशभरातील दृष्टीकोन साकार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. सुमारे 55 हजार कोटी रुपये खर्चून बांधला जाणारा 701 किमीचा द्रुतगती मार्ग - हा भारतातील सर्वात लांब द्रुतगती मार्गांपैकी एक आहे. जो महाराष्ट्रातील 10 जिल्हे अमरावती, औरंगाबाद, नाशिक या प्रमुख शहरी क्षेत्रांमधून जातो. द्रुतगती मार्गामुळे लगतच्या इतर 14 जिल्ह्यांचा संपर्क सुधारण्यास मदत होणार आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या प्रदेशांसह राज्यातील सुमारे 24 जिल्ह्यांचा विकास होण्यास यामुळे मदत होईल.

महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला मिळणार चालना - समृद्धी महामार्ग, दिल्ली मुंबई द्रुतगती मार्ग, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आदी पायभूत सुविधाच्या विकासामुळे राज्यातील विकासाला चालना मिळणार आहे. पंतप्रधान गती शक्ती अंतर्गत पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी प्रकल्पांच्या एकात्मिक नियोजन समन्वित अंमलबजावणीच्या दृष्टीला समर्थन देत अजिंठा, एलोरा लेणी, शिर्डी, वेरूळ, लोणार इत्यादी पर्यटन स्थळांना समृद्ध करण्यास मदत मिळणार आहे. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला मोठी चालना देण्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे.

नागपूर मेट्रो - नागरी गतिशीलतेमध्ये क्रांती घडवून आणणाऱ्या आणखी एका टप्प्यात पंतप्रधान ‘नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा’ राष्ट्राला समर्पित करतील. खापरी मेट्रो स्टेशनवर ते खापरी ते ऑटोमोटिव्ह स्क्वेअर (ऑरेंज लाइन), प्रजापती नगर ते लोकमान्य नगर (एक्वा लाइन) या दोन मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा 8 हजार 650 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित करण्यात आला आहे. 6 हजार 700 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित होणाऱ्या नागपूर मेट्रो फेज-2 ची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.

एम्स नागपूर - देशभरातील आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेला AIIMS नागपूरच्या समर्पणामुळे बळकटी मिळणार आहे. जुलै 2017 मध्ये पंतप्रधानांनी ज्या रुग्णालयाची पायाभरणीही केली होती. त्या रुग्णालयाची स्थापना प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. एम्स नागपूर, 1 हजार 575 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित केले जाणारे, अत्याधुनिक रुग्णालय आहे, ज्यामध्ये ओपीडी, आयपीडी, निदान सेवा, ऑपरेशन थिएटर्स आदी सुविधांचा समावेश आहे. वैद्यकीय क्षेत्रातील सर्व प्रमुख विशेष सुपरस्पेशालिटी विषयांचा समावेश असलेले 38 विभाग या रुग्णालयात आहेत. हे रुग्णालय महाराष्ट्राच्या विदर्भात आधुनिक आरोग्य सुविधाला बळकटी देणार आहे. गडचिरोली, गोंदिया मेळघाटच्या आदिवासी भागातील रुग्णासाठी नागपूर एम्स वरदान ठरणार आहे.

रेल्वे प्रकल्प - नागपूर रेल्वे स्थानकावर पंतप्रधान नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. नागपूर येथील सार्वजनिक समारंभात पंतप्रधानांच्या हस्ते अनुक्रमे 590 कोटी तसेच 360 कोटी रुपये खर्चून पुनर्विकसीत करण्यात येणाऱ्या नागपूर रेल्वे स्थानक, अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी होणार आहे. पंतप्रधान सरकारी देखभाल डेपो, अजनी (नागपूर) तसेच कोहली-नारखेर विभाग नागपूर-इटारसी थर्ड लाइन प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. हे प्रकल्प सुमारे 450 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आले आहेत. तसेच मोदी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थ, नागपूर ते देखील देशाला समर्पित करतील

Last Updated : Dec 11, 2022, 10:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.