नागपूर - सभागृहात जाण्यापूर्वी विधिमंडळ पक्ष कार्यलायात आमदारांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी इतर महत्त्वाच्या चर्चेसह भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदचे विरोधी पक्ष नेते म्हणून प्राविण दरेकर यांच्या नावाची घोषणा केली. दरम्यान, अधिकृत घोषणा सभागृहात केली जाईल.
आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात 'मी पण सावरकर' असे लिहलेल्या टोप्या विरोधकांनी घातल्या आहेत. सरकारची कोंडी करायची झाल्यास आक्रमक नेता हवा, म्हणून प्रविण दरेकर यांच्या नावाला पसंती देण्यात आल्याची चर्चा आहे. दरेकर हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात.
हेही वाचा - आजपासून हिवाळी अधिवेशन; सावरकरांच्या मुद्यावरून भाजप आक्रमक होणार
आज दुपारी विधानपरिषदेत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल. भाजपच्या मित्र पक्षांकडूनसुद्धा विरोधी पक्ष नेते पद देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, भाजपने पक्ष बैठकीत अचानकपणे प्रविण दरेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. यावर मित्रपक्ष काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.