नागपूर - राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावरील गोळीबाराची घटना ताजी असतानाच बुधवारी शिवसेना नेत्यावर गोळीबार झाल्याने राज्यात गुंड टोळ्या पुन्हा डोके वर काढत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.
हेही वाचा - राज्यपालांच्या अभिभाषणवर चर्चा, प्रविण दरेकरांनी विविध प्रश्नाकडे वेधले लक्ष
यावेळी दरेकर म्हणाले, गोपीनाथ मुंडे ज्यावेळी राज्याचे गृहमंत्री होते, त्यावेळी त्यांनी अशा टोळ्यांना ठेचून काढले होते. त्याच प्रकारे कारवाई करण्याची आज गरज असल्याचे दरेकर म्हणाले.
हेही वाचा - विधानभवन परिसरात काँग्रेसची बैठक, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता
दरम्यान, गेल्या २ दिवसांच्या गदारोळानंतर बुधवारी विधानसभेचे कामकाज सुरळीत सुरू झाले. आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. या दिवशी देखील विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी रणनिती निश्चित केली आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या आमदारांनी देखील विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी जय्यत तयारी केल्याचे पाहायला मिळत आहे.