नागपूर - नागपुरात थकीत वीज बिलामुळे वीज कनेक्शन तोडायला गेलेल्या वीज कर्मचाऱ्याला जबर मारहाण करण्यात आली. यात वीज कर्मचारी गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत भेंडे ले-आऊट परिसरात इंद्रप्रस्थ नगरमधील ही घटना असून सुखदेव केराम असे जखमीचे नाव आहे.
अशी घडली घटना
इंद्रप्रस्थ नगर जयताळा वितरण केंद्र त्रिमूर्ती नगर सबडिव्हीजन अंतर्गत कृष्णा वाठ यांच्याकडे पाच हजार एकशे पंचावन्न रूपयाचे वीज बिल थकित होते. वाठ कुटुंबाचे वीज कनेक्शन तोडण्यासाठी वीज वितरणचे चम्मू गेले होते. वारंवार वीज बिल भरण्याची नोटीस देऊनही वीज बिल न भरत असल्याने वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय कंपनीनेच्या चमूने घेतला. याच वेळी संबंधित ग्राहकाने वीज वितरण कर्मचाऱ्यांशी वाद घालायला सुरुवात केली. हाच वाद पुढे वाढत गेला. त्यानंतर ग्राहकाने संबंधित वीज वितरण कर्मचारी असलेले सुखदेव केराम यांच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने वार केला. यात केराम हे गंभीर जखमी झाले आहे. या हल्ल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाय शासकीय कामात अडथळा आणल्यामुळे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. संबंधित कर्मचाऱ्याचे जबाब घेऊन पुढील तपास पोलीस करत आहे.
कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या घटनेत वाढ
सरकार व प्रशासनाच्या चूकीच्या धोरणामुळे 73000 कोटीची थक्कबाकी झाली आहे. याचे परिणाम मात्र वीज कर्मचारी यांना भोगावे लागत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत कोरोनानंतर वीज बिल थकीत असल्याचे प्रमाणात वाढले आहे. यामुळे वीज बिल वसूलीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याच्या घटने वाढ झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मारहाणीच्या घटना वाढत आहे. वर्ध्यात अशाच एका वीज कनेशनच्या कारवाई दरम्यान वीज वितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला जोरदार मारहाण करण्यात आली होती.
वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी
घटनेची माहिती मिळताच सोनेगाव पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन सघंटनेचे नागपूर झोनल उपाध्यक्ष सहायक अभिंयता श्रीरंग मुत्तेपवार व विभागीय सचिव सूचित पाठक आणि पदाधिकारी कॉ.वहिले तसेच इतर सघंटना पदाधिकारी यांनी या घटनेचा वर्कर्स फेडरेशन सघंटनेने जाहीर निषेध केला आहे. शिवाय वीज कर्मचाऱ्यांना सरकार व प्रशासनाने संरक्षण प्रदान करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - या नद्यांवर कमानीचे बांधकाम करा: राजू शेट्टींनी सांगितले हे उपाय