नागपूर - रामटेक तालुक्यातील काचुरवाही येथे एका पोस्ट मास्तरची हत्या करून मृतदेह शेतात पुरल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अशोक धनीराम वाडिभस्मे(वय 54), असे मृताचे नाव आहे. शेतीच्या पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा - नागपूर: गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात अवघ्या २४ तासात तिघांची हत्या
अशोक हे काचुरवाही येथे पोस्टर मास्तर आहेत. ते 6 जानेवारीपासून बेपत्ता होते. या संदर्भात बेपत्ता झाल्याची तक्रार रामटेक पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलीस चौकशी दरम्यान आज(9 जानेवारी) सकाळी त्यांचा मृतदेह एका शेतात पुरलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास रामटेक पोलीस करत असून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.