ETV Bharat / state

विदर्भात शुक्रवारपासून तीन दिवस पावसाची शक्यता - weather forecast

विदर्भात पुढील तीन दिवस प्रादेशिक हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात वाढलेल्या तापमानापासून नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी शक्यता आहे.

विदर्भात पाऊस
विदर्भात पाऊस
author img

By

Published : Apr 8, 2021, 3:30 PM IST

नागपूर - उद्यापासून (शुक्रवार) पासून पुढील तीन दिवस संपूर्ण विदर्भात पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे विदर्भात गेल्या काही दिवसात वाढलेल्या तापमानापासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विदर्भात पावसासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे.

सध्या नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्याचे तापमान ४३ डिग्री पर्यंत गेले आहे. त्यामुळे प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. दुपारच्या वेळेस रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळत होता. मात्र, हवेची दिशा बदलल्याने आता ९ ते ११ एप्रिल दरम्यान विदर्भात ढगांच्या गडगडाटसह हलक्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविली आहे. साधारणपणे एप्रिल महिन्यात राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे विदर्भातील तापमान ४५ डिग्री पर्यंत जाते. मात्र, दोन दिवसांपासून वाऱ्याने दिशा बदलली असल्याने वातावरण दमटपणा वाढला आहे. ज्यामुळे पावसाची शक्यता निर्माण झाल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे

तीन दिवस पावसाची शक्यता
विदर्भात तापमान ४२ पार ....

एप्रिल महिन्यात विदर्भातील सर्वच जिल्ह्यांच्या तापमानात कमालीची वाढ झालेली आहे. हवामान विभागाकडून उष्णतेची लाट असल्याचे जाहीर करण्यात आले नाही. तरीही परिस्थिती त्याचप्रमाणे जाणवत आहे. मात्र, आता हवामान विभागाने तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने तापमानात काही प्रमाणात का होईना घट होणार आहे. मात्र, तीन दिवसांनी पुन्हा तापमान वाढायला सुरुवात होईल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.