नागपूर - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जात होते. त्यांची हीच कार्यक्षमता त्यांच्या प्रगतीच्या आड आल्याची प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक आणि जेष्ठ पत्रकार भुपेंद्र गणवीर यांनी दिली.
पक्षाने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी कशामुळे नाकारली या संदर्भात कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे बावनकुळे यांना मानणारा वर्ग नाराज झालेला आहे. बावनकुळे हे तेली समाजातून येतात आणि पूर्व नागपुरातील प्रत्येक मतदारसंघात तेली समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे तेली समाज देखील मोठ्या प्रमाणात नाराज होण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा - ब्राम्हण महासंघाचा चंद्रकांत पाटलांना पाठींबा; पत्रक काढून केलं जाहीर
हेही वाचा - सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याआधीच सरकारने आरेतील झाडांची कत्तल केली - नीलम गोऱ्हे
या सर्व घटनाक्रमावर बावनकुळे यांनी अत्यंत संयमी भूमिका घेतली आहे. तरीसुद्धा यामुळे भाजपचे नुकसान कमी होणार असले तरी ग्रामीण भागात याचा फटका भाजपला बसू शकतो असे राजकिय विश्लेषकांचे मत आहे. निवडणुकीच्या आधी भाजपने राज्यात मेगा भरती घेतली आहे. तेव्हा भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना आगामी कॅबीनेटमध्ये समाविष्ट करण्याच्या उद्देशाने देखील विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.