नागपूर: कौटुंबिक तणावातून एका पोलीस कर्मचाऱ्याने धक्कादायक पद्धतीने आत्महत्या केली आहे. ही घटना नागपुर येथील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. काशीनाथ भगवान कराडे (४०) असे पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. हे पोलीस कर्मचारी माजी सैनिक होते. ते २०१९ साली पोलीस दलात भर्ती झाल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे.
काशीनाथ भगवान कराडे हे गिट्टीखदान पोलीस स्टेशनला नेमणुकीस होते. त्याच भागात भाड्याने खोली करून वास्तव्यास होते. मुळचे सातारा जिल्ह्यातील कराडवाडी खंडाळा येथील रहिवासी आहेत. गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, त्यांनी आत्महत्या का केली यासंदर्भात नेमके कारण समजू शकले नाही. ते गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. त्याच तणावातून त्यांनी आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.
घटनेचा सीसीटीव्ही आला पुढे:- काशीनाथ भगवान कराडे दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी डीपी जवळ जाऊन आत्महत्या केली. पहिला प्रयत्न फसल्यामुळे त्यांनी परत डीपी जवळ जाऊन आत्महत्या केली. ही संपूर्ण घटना डीपी समोरच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
काही क्षणात सर्व काही संपले- काशीनाथ भगवान कराडे भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झाल्यनंतर ते नागपूर शहर पोलीस दलात सेवेसाठी रूजू झाले. ते पेशननगर येथे एका सहकाऱ्यासोबत भाड्याने खोली घेऊन राहत होते. काशीनाथ यांनी सोमवारी दुपारी खोली समोरच असलेल्या ईलेक्ट्रिक डीपी जवळ जाऊन आत्महत्या केली. वीजेचा धक्का लागून ते होरपळून गेले. यातच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे येथे एकच गोंधळ उडाला होता. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्यांच्या आत्महत्येने अनेकजण हळहळ व्यक्त करत आहे. पोलिसांवर बंदोबस्त, गुन्हेगारांता तपास, आठहून अधिक तास काम अशा विविध कारणांमुळे तणाव असतो. या पार्श्वभूमीवर कामाचे तास आठच असावेत, अशी अपेक्षा पोलीस कर्मचाऱ्यांमधून होते. त्याचबरोबर वयाच्या चाळीशीनंतर वजन नियंत्रित ठेवणे, संतुलित आहार, तणाव नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायाम व योगा करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतो.
हेही वाचा-