ETV Bharat / state

Hanuman Chalisa Recite : उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठणास पोलिसांचा नकार; महिलांनी संविधान चौकात केले पठण - उपमुख्यमंत्री नागपूर निवासस्थान

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरतील निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठणाला पोलिसांनी परवानगी नाकारली. यानंतर वर्धा जिल्ह्यातील बचतगटांचे काम करणाऱ्या आंदोलकर्त्या महिलांनी संविधान चौकात हनुमान चालीसाचे पठण केले आहे.

Hanuman Chalisa Recite
हनुमान चालीसा पठणास पोलिसांचा नकार
author img

By

Published : Feb 13, 2023, 3:53 PM IST

नागपूर : वर्धा जिल्ह्यात बचतगटांचे काम करणाऱ्या 42 प्रभाग संघ व्यवस्थापक महिला तब्बल सात दिवसांपासून नागपुरातील संविधान चौक येथे आंदोनाला बसले आहेत. उपमुख्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस न्याय देतील या अपेक्षाने महिला बसल्या आहे. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यां महिला उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थाना बाहेर हनुमान चालीसा पठाण करणार होत्या. मात्र, पोलीस प्रशासनाने त्यांना परवानगी नाकारल्यामुळे आंदोलकर्त्या महिलांनी संविधान चौकात हनुमान चालीसाचे पठण केले आहे.

महिलांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन : 'युवा परिवर्तन की आवाज' वर्धा जिल्हाच्यावतीने आपले नेतृत्वात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत प्रभाग संघ आंदोलन सुरू करण्यात आले. 08 ते 10 महिने पासुन थकित असलेले मानधन तात्काळ देण्यात यावे, त्यांना कामावरून कमी केलेल्या प्रभाग संघ व्यवस्थापक महिलांना पुन्हा कामावर घेण्यात यावे या व इतर मागण्यासंदर्भात आंदोलनकर्त्यांच्या आहेत. 06 फेब्रुवारी पासून 40 महिलांच्या उपस्थितीत संविधान चौक नागपुर येथे बेमुदत गांधीगिरी आंदोलन सुरू आहे. परंतु अद्याप त्यांच्या मागण्याच्या संदर्भात तोडगा न निघाल्याने महिलांनी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पाठ करण्याचा पवित्रा घेतला होता.

पोलिसांनी दिली नोटीस : नागपूर पोलिसांनी नोटीसमध्ये नमूद केले की, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे धरमपेठ नागपुर येथील निवासस्थान हे खाजगी निवासस्थान आहे. याठिकाणी आपणास हनुमान चालिसा पाठ करण्याची परवानगी देण्यात आली नाही. सदर ठिकाणी कोणतीही अप्रिय घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणास सर्वस्वी जबाबदार धरले जाईल. परिणामी आपल्याविरूध्द योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल यांची नोंद घ्यावी. सदर नोटीसचा उपयोग भविष्यात आपणाविरूध्द व बेमुदत आंदोलनावर बसलेल्या सर्वाविरूध्द पुरावा म्हणुन करण्यात येईल, याची आपल्या सहका-यांना जाणीव करून द्यावी करिता कलम 149 सी.आर.पी.सी. अन्वये नोटीस देण्यात येत आहे.

संविधान चौकात हनुमान चालीसा पठण : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुर येथील निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करून शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा बचतगटांचे काम करणाऱ्या 42 प्रभाग संघ व्यवस्थापक महिलांचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांनी या महिलांना सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारल्यानंतर या आंदोलक महिलांनी संविधान चौकातच हनुमान चालीसा पठण केले.

हेही वाचा : Eknath Shinde On Mahavikas Aghadi: आमच्या संख्याबळाऐवजी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या प्रादेशिक कार्यकारणीचा विचार करावा - एकनाथ शिंदे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.