नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर पंतप्रधानांनी नागपूर मेट्रोच्या फ्रीडम पार्क स्टेशनवरून तिकीट खरेदी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नागपूर मेट्रोची फ्रीडम पार्क ते खापरी अशी राइड घेतली. विद्यार्थ्यांशी संवाद साधला पंतप्रधानांनी नागपूर मेट्रोच्या फ्रीडम पार्क स्थानकावर तिकीट खरेदी (PM Narendra Modi takes ride on Nagpur Metro) केले.
मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सहाव्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. ही रेल्वे महाराष्ट्रातील नागपूर आणि छत्तीसगडच्या बिलासपूर दरम्यान धावेल. ट्रेनला हिरवी झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे हात हलवला. पंतप्रधान मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवणारी ही सहावी वंदे भारत एक्सप्रेस आहे. पंतप्रधानांचे आज नागपुरात आगमन झाले, तेथे त्यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले (PM Modi flags off Vande Bharat Express) होते.
प्रकल्प राष्ट्राला समर्पित : मोदी हे नागपुरातील सार्वजनिक समारंभात ते अनुक्रमे ५९० कोटी आणि ३६० कोटी रुपये खर्चून नागपूर रेल्वे स्थानक आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. पंतप्रधान सरकारी देखभाल डेपो, अजनी (नागपूर) आणि कोहली-नारखेर विभाग नागपूर-इटारसी थर्ड लाइन प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. हे प्रकल्प अनुक्रमे 110 कोटी रुपये आणि सुमारे 450 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आले आहेत. पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली आमची अनेक स्वप्ने साकार झाली आहेत, असे स्थानिक सांगतात. या विकासकामांचा अभिमान वाटतो, इतक्या दिवसांनी काहीतरी चांगले घडतेय, असे आणखी एक स्थानिक (ride on Nagpur Metro) सांगतात.
आर्थिक विकासाला चालना - समृद्धी महामार्ग, दिल्ली मुंबई द्रुतगती मार्ग, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आदी पायभूत सुविधाच्या विकासामुळे राज्यातील विकासाला चालना मिळणार आहे. पंतप्रधान गती शक्ती अंतर्गत पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी प्रकल्पांच्या एकात्मिक नियोजन समन्वित अंमलबजावणीच्या दृष्टीला समर्थन देत अजिंठा, एलोरा लेणी, शिर्डी, वेरूळ, लोणार इत्यादी पर्यटन स्थळांना समृद्ध करण्यास मदत मिळणार आहे. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला मोठी चालना देण्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे.
नागपूर मेट्रो - नागरी गतिशीलतेमध्ये क्रांती घडवून आणणाऱ्या आणखी एका टप्प्यात पंतप्रधान ‘नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा’ राष्ट्राला समर्पित केला. खापरी मेट्रो स्टेशनवर ते खापरी ते ऑटोमोटिव्ह स्क्वेअर (ऑरेंज लाइन), प्रजापती नगर ते लोकमान्य नगर (एक्वा लाइन) या दोन मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा 8 हजार 650 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित करण्यात आला आहे. 6 हजार 700 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित होणाऱ्या नागपूर मेट्रो फेज-2 ची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली.
एम्स नागपूर - देशभरातील आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेला एम्स नागपूरच्या समर्पणामुळे बळकटी मिळणार आहे. जुलै 2017 मध्ये पंतप्रधानांनी ज्या रुग्णालयाची पायाभरणीही केली होती. त्या रुग्णालयाची स्थापना प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. एम्स नागपूर, 1 हजार 575 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित केले जाणारे, अत्याधुनिक रुग्णालय आहे, ज्यामध्ये ओपीडी, आयपीडी, निदान सेवा, ऑपरेशन थिएटर्स आदी सुविधांचा समावेश आहे. वैद्यकीय क्षेत्रातील सर्व प्रमुख विशेष सुपरस्पेशालिटी विषयांचा समावेश असलेले 38 विभाग या रुग्णालयात आहेत. हे रुग्णालय महाराष्ट्राच्या विदर्भात आधुनिक आरोग्य सुविधाला बळकटी देणार आहे. गडचिरोली, गोंदिया मेळघाटच्या आदिवासी भागातील रुग्णासाठी नागपूर एम्स वरदान ठरणार आहे.
रेल्वे प्रकल्प - नागपूर रेल्वे स्थानकावर पंतप्रधानांनी नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखवला. नागपूर येथील सार्वजनिक समारंभात पंतप्रधानांच्या हस्ते अनुक्रमे 590 कोटी तसेच 360 कोटी रुपये खर्चून पुनर्विकसीत करण्यात येणाऱ्या नागपूर रेल्वे स्थानक, अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी झाली. पंतप्रधान सरकारी देखभाल डेपो, अजनी (नागपूर) तसेच कोहली-नारखेर विभाग नागपूर-इटारसी थर्ड लाइन प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. हे प्रकल्प सुमारे 450 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आले आहेत. तसेच मोदी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थ, नागपूर ते देखील देशाला समर्पित केले.