ETV Bharat / state

'प्राथमिक आरोग्य केंद्रात पेडियाट्रीक कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन करा' - प्राथमिक आरोग्य केंद्रात पॅडीयाट्रीक कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन करा...

कोरोनाच्या तिस-या लाटेची शक्यता वैदयकीय जगताकडून वर्तविण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेचा इशारा लक्षात घेऊन लहान मुलं आणि बालकांसाठी ग्रामीण भागात तालुकानिहाय पेडीयाट्रीक कोविड केअर सेंटर उभारण्याचे आदेश पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांन दिले आहे.

कोविड केयर सेंटर
कोविड केयर सेंटर
author img

By

Published : May 18, 2021, 12:27 PM IST

नागपूर - कोरोनाच्या तिस-या लाटेची शक्यता वैदयकीय जगताकडून वर्तविण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेचा इशारा लक्षात घेऊन लहान मुलं आणि बालकांसाठी ग्रामीण भागात तालुकानिहाय पेडीयाट्रीक कोविड केअर सेंटर उभारण्याचे आदेश पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी दिले. गेल्या काही दिवसांत रूग्ण संख्या कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तिसऱ्या लाटेचा अंदाज पाहता ग्रामीण भागात वैदयकीय व्यवस्थेच्या नियोजनाचे सादरीकरण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिपक सेलोकार यांनी केले. त्यानुसार जिल्हयात प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, इमारत स्तरावर पेडीयाट्रीक कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत. या सेंटरव्दारे 130 बेड उपलब्ध होतील. जिल्हयात 0 ते 6 वयोगटात 1 लक्ष 67 हजार 501 लहान मुले आहे. तेच 6 ते 18 वयोगटात 4 लक्ष 5 हजार 793 अशी बालकांची संख्या असून 0 ते 18 वर्षे वयोगटात एकूण 5 लक्ष 73 हजार 294 बालकांची संख्या आहे. ग्रामीण भागातील पेडीयाट्रीक कोविड केअर सेंटरच्या कामासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असून तालुका आरोग्य अधिकारी याचे सदस्य सचिव असणार आहेत.

लहान मुलांच्या कोविड केअरसाठी प्रशिक्षण होणार-
या दरम्यान मनुष्यबळ,औषधे, वैदयकीय उपकरणे यांची उपलब्धता करून देण्यासाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. प्रत्येक सेंटरला सहा महिन्यांसाठी 50 लक्ष रूपयांचा निधी खर्च अंदाजित आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशन व जिल्हा व्यवस्थापन निधीतून हा खर्च करण्यात येईल. सध्या केलेल्या नियोजनानुसार 6 कोटी 54 लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. टेलीमेडीसीन उपचार पध्दतीव्दारे शहरातील बालरोगतज्ञ या सेंटरमधील कार्यरत डॉक्टरांना उपचार पध्दतीत मार्गदर्शन करतील,अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मेडीकल व पॅरा-मेडीकल स्टॉफला पेडीयाट्रीक कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण या महिन्याअखेरपर्यंत देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील लोकांना शहरात बेड मिळाले नाही. दुसऱ्या लाटेमध्ये शहरातील मोठ्या दवाखान्यांमध्ये ग्रामीण रुग्णांना लवकर बेड मिळत नसल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी केली. ग्रामीण भागातील प्राथमिक उपकेंद्र तसेच प्राथमिक केंद्र या ठिकाणी ऑक्सिजनची सुविधा असणारे बेड निर्माण करावे, तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी, सामाजिक दायित्व निधीतून ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कामे व्हावी असे सुचविण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, महिला व बालकल्याण समिती सभापती उज्वला बोढारे, शिक्षण सभापती भारती पाटील,समाजकल्याण सभापती नेमावली माटे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर,जिल्हा शल्य चिकीत्सक देवेंद्र पातुरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिपक सेलोकार उपस्थित होते.

हेही वाचा-चक्रीवादळ गुजरातला धडकले; जमीनीवर आल्यानंतर तीव्रता कमी..

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.