ETV Bharat / state

नागपुरातील माया गँगचा म्होरक्या जेरबंद; विदेशी जीवंत पिस्तुलासह काडतुसे जप्त

नागपुरात एका कुख्यात गुंडाला अटक करून दोन विदेशी पिस्तूल, जीवंत काडतूस आणि तलवार जप्त केली आहेत.

नागपुरातील माया गँगचा म्होरक्या जेरबंद
author img

By

Published : Jul 24, 2019, 10:15 PM IST

नागपूर - गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या एकत्रित करून संघटीत गुन्हेगारी करणारा माया गँगचा म्होरक्या सुमित चिंतलवार याला त्याच्या साथीदारांसह अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दोन विदेशी पिस्तूल, जीवंत काडतूस आणि तलवार जप्त केली असून गुन्हेशाखा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

नागपुरातील माया गँगचा म्होरक्या जेरबंद

सुमित हा खुंखार आरोपी आहे. त्याच्यावर १०च्यावर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, अंमली पदार्थ आणि दारू तस्करीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. नागपुरात नव्हेतर इतर शहरात देखील त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. कुख्यात गुंड सुमित हा काही दिवस तडीपार होता. त्यावेळीही त्याने अनेक गुन्हे केले आहेत. तो अनेक वेगवेगळ्या गुंडांना अकत्रित करून माया गँग चालवायचा. आज देखील एका प्रतिस्पर्धी टोळीतील एकाचा गेम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा टाकत त्याला अटक केली.

Intro:गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या एकत्रित करून संघटीत गुन्हेगारी करणारा , माया गॅंग चा मोरक्या सुमित चिंतलवार याला गुन्हेशाखा पोलिसांनी त्याच्या साथीदारांसह अटक केली असून त्याच्या कडून दोन विदेशी पिस्तूल , जिवंत काडतूस आणि तलवार जप्त केली , हि गॅंग प्रतिस्पर्धी गुन्हेगाराचा गेम करण्याच्या तयारीत होती Body:नागपुरातील कुख्यात गुंड तथा माया गॅंगचा
मोरक्या सुमित चिंतलवार आणि त्याचे
साथीदार पोलिसांच्या कस्टडीत पोहचले आहेत.. सुमित हा खुंखार आरोपी असून त्याच्या वर नागपूर शहरात १० च्या वर गुन्हे आहेत....ज्यामध्ये हत्या , हत्येचा प्रयत्न , अपहरण ,गोळीबार , आम्ली पदार्थ आणि दारू तस्करी चे गुन्हे आहेत तर इतर शहरात सुद्धा त्याच्यावर गुन्हे आहे .. सुमित हा काही दिवस तडीपार सुद्धा होता मात्र त्याकाळात सुद्धा त्याने अनेक गुन्हे केले ... तो अनेक वेगवेगळ्या टोळ्यातील गुंडाना एकत्रित करून आपली माया गॅंग चालवायचा .. तो शहरात प्रतिस्पर्धी टोळीतील एकाच गेम करण्याच्या तयारीत होता अशी माहिती पोलिसांना होती आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळण्यात यश मिळताना दिसत आहे
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.