नागपूर - मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावासह ११ गावामध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे. बोरगाव परिसरात दोन जनावरांची वाघाने शिकार केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नागपूरची संत्रा नगरी सोबतच टायगर कॅपीटल म्हणून ओळख आहे. जवळपास २०० किमीच्या परिसरात २०० पेक्षा जास्त वाघांची संख्या आहे. त्यामुळे या भागात वाघाचा वावर दिसून येते. गेल्या ६ सप्टेंबरपासून नागरिकांना या परिसरात वाघ दिसत आहे. त्यांनी वनविभागाकडे तक्रार देखील केली. त्यानंतर वनविभागाकडून शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र, अद्यापही वाघाला जेरबंद करण्यात यश आलेले नाही. वनविभागाचे विशेष व्याघ्र संरक्षण दल बोरगावसह परिसरातील जंगलामध्ये शोधमोहीम राबवत आहे.