ETV Bharat / state

हिंगणा तालुक्यात डॉक्टरांच्या दुर्लक्षपणामुळे रुग्णाचा मृत्यू

पत्नीने आपल्या पतीच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांना अनेक वेळा कळवले. मात्र, डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी पतीची प्रकृती ढासळली. त्यांना ऑक्सिजन लावण्यात आल्याच्या काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला.

मृत रुग्णाची पत्नी
मृत रुग्णाची पत्नी
author img

By

Published : Sep 8, 2020, 6:02 PM IST

नागपूर- रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे नवऱ्याचा जीव गेल्याचा गंभीर आरोप एका पत्नीने केला आहे. हा संपूर्ण प्रकार हिंगणा तालुक्यातील वानडोंगरीच्या शालिनीताई मेघे रुग्णालयातील आहे. या प्रकरणी सामाज माध्यमांवर एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

माहिती देताना मृत रुग्णाची पत्नी

रेल्वेतून सेवानिवृत्त झालेली एक व्यक्ती चार दिवसांपासून शालिनीताई मेघे रुग्णालयात उपचार घेत होती. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली, मात्र श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी देखील त्याच ठिकाणी भर्ती होत्या. त्यांनी पतीच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांना अनेक वेळा कळवले. मात्र, डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी त्यांची तब्येत ढासळली. ऑक्सिजन लावण्यात आल्याच्या काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. रुग्णाचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

हेही वाचा- नागपूर: शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा लाईन अद्याप नादुरुस्त, रुग्णांना मेयोत हलवले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.