ETV Bharat / state

Online School : ऑफलाईन सोबत ऑनलाईन शाळा सुरू करावी : पालक संघटनेची मागणी - ऑनलाईन शाळा सुरू करण्याची मागणी

सध्या कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत ( Corona and omicron increased ) आहेत. त्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवण्यासाठी घाबरत आहेत. त्यामुळे ऑफलाइन सोबत ऑनलाईन शाळा सुरू ( Demand to continue school online ) करावी, अशी नागपूरच्या पालकांची मागणी आहे.

online school
ऑनलाईन शाळा
author img

By

Published : Jan 5, 2022, 5:00 PM IST

नागपूर : राज्यभरासह नागपुरात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळानी ऑनलाइन शाळा पूर्णता बंद करून ऑफलाइन पद्धतीने शिकवणे सुरू केले आहे. पण ओमायक्रॉनची भीती वाढली ( Fear of omicron increased ) आहे. त्यामुळे काही पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार होत नाही. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने शिकवणी बंद असल्याने त्या मुलांचा अभ्यास बुडत आहे. त्यामुळे राष्ट्रीय शिक्षक पालक संघटनेचे ( National Teachers Parents Association ) राज्य संयोजक यांनी शाळा ऑनलाइन सुरू ठेवाव्यात अशी मागणी ( Demand to continue school online ) निवेदनातून केली आहे.

ऑफलाईन सोबत ऑनलाईन शाळा सुरू करावी पालक संघटनेची मागणी
राज्यभरात शाळा सुरू होऊन एक महिना ही झाला नाही, तर ओमायक्रॉनच्या भीतीमुळे पालक संभ्रमावस्थेत सापडले आहेत. मुलांना शाळेत पाठवले तर ओमायक्रॉनची बाधा होण्याचा धोका आहे. शाळेत नाही पाठवले तर अभ्यास बुडण्याची भीती आहे. त्यामुळे नेमकं करावं तरी काय असा प्रश्न पालकांपुढे आता उभा ठाकला आहे. परंतु ऑनलाइन शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होत आहे. अशा अनेक तक्रारी पालक करत असल्याचे राष्ट्रीय शिक्षक पालक संघटनेचे संयोजक योगेश पाथरे ( NTPA Coordinator Yogesh Pathre ) यांनी सांगितले.
सध्याच्या घडीला ऑनलाईन पद्धतीने शिकवले गेले पाहिजे -
कोरोनाच्या वाढत्या धोक्यापुढे शाळा सुरू केल्या आहेत. त्यासाठी पालकांकडून संमती पत्र मागवले जात आहे. यात सर्व जवाबदारी आमच्या खांद्यावर टाकून देण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे जे पालक ऑफलाइन शाळेला पाठवण्यास तयार नाहीत, अशा मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिकवले जावे अशी मागणी होत आहे. जेणेकरून त्यांचा अभ्यास बुडणार नाही. तसेच पुढील काळात परिस्थिती बिघडली तरी तो पर्याय आतापर्यंत सुरू होता. त्याच पद्धतीने पुढेही उपलब्ध राहील त्यामुळे अभ्यासावर परिणाम होणार नाही.
काही जिल्ह्यातून पालकांच्या तक्रारी येत आहे -
राज्यातील अमरावती, नागपूर, अकोला, जळगाव या जिल्ह्यातून पालक फोन करून अडचणी सांगत आहेत. शाळा ऑफलाईनचा आग्रह धरत आहे. त्यामुळे शासनानेच मध्य साधून शाळा ऑफलाइन सुरू करण्याच्या निर्णयावर पुन्हा विचार करावा. जेणेकरून पालकांचा संभ्रम दूर होऊन भीती दुरु होईल. तसेच मुलांच्या ऑनलाइन अभ्यासाचा पर्याय आताही उपलब्ध करून दिल्यास कोरोनाची भीती दूर होण्यास दिलासा मिळेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.