नागपूर- आम्ही दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना मदत करण्यास तयार आहोत. त्याकरिता साडेसहा हजार कोटींची मदत जाहीर केलेली आहे. त्यापैकी जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन हजार कोटींची मदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन देऊन विरोधकांनी राजकारण करू नये, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवन परिसरात लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधला. त्याववेळी त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, केंद्रात विरोधकांची सरकार आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी पंतप्रधानांकडे मागणी करावी. त्यांना मागणी करता येत असेल तर त्यांनी ती करावी, आम्ही त्यांना साथ देऊ, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्याचबरोबर, देशात जालीयनबाग सारखी पुनरावृत्ती होत आहे. फडणवीसांनी आधीच सामना वाचला असता तर आज आमचा आणि त्यांचा सामना झाला नसता. फडणवीस सामना वाचत नाही असे सांगत होते. मात्र, आज त्यांच्या हातात सामना दिसला. त्यामुळे आम्ही सामनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे, जनतेचे विषय मांडत होतो हे त्यांनी कबूल केले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
हही वाचा- बहिणीने मित्रासोबत पळून जाऊन केले लग्न, भावाने बहिणीवर गोळीबार करून स्वतः केली आत्महत्या