ETV Bharat / state

Online Game Fraud Case : ऑनलाइन गेम फसवणूक प्रकरण; आरोपी सोंटू जैनच्या अडचणी वाढणार - सोंटू जैनच्या संपत्तीचा लिलाव

Online Game Fraud Case : व्यापाऱ्याला ऑनलाइन गेममधून 58 कोटींचा गंडा घातल्याच्या घटनेनं मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अनंत उर्फ सोंटू जैन हा दुबईत पळून गेला आहे. दुबईत असलेल्या आरोपीनं आपला व्हिसा 14 दिवसानं वाढवून घेतल्यानं नागपूर पोलिसांवर टीका करण्यात येत आहे.

Online Game Fraud Case
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 10:13 AM IST

नागपूर : Online Game Fraud Case : ऑनलाइन गेमच्या जाळ्यात अडकवल्यानंतर नागपूरच्या व्यापाऱ्याला तब्बल 58 कोटींचा गंडा घालणारा आरोपी अनंत उर्फ सोंटू जैन हा दुबईला पळून गेला होता. मात्र, आता तो तिथून देखील अन्यत्र पळून जाण्याच्या तयारीत असल्याची शंका निर्माण झाली आहे. 19 जुलैला केवळ एका महिन्याच्या पर्यटक व्हिसावर दुबईला पळून गेलेल्या सोंटू जैननं त्याचा व्हिसा 14 ऑक्टोबरपर्यंत वाढवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांनी आरोपीला फरार घोषित करण्याची तयारी केली. सोंटू जैनच्या संपत्तीचा लिलाव करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती पुढं आली आहे.

पोलिसांनी काढली लूकआउट नोटीस : आरोपी अनंत उर्फ सोंटू जैन हा पर्यटक व्हिसा संपल्यानंतर भारतात परतणार होता. मात्र भारतात परतल्यावर त्याला अटक करण्याची तयारी नागपूर पोलिसांनी केली होती. नागपूर पोलिसांनी त्यासाठी लूकआउट नोटीस ( Look Out Notice ) सुद्धा काढली होती. मात्र, आरोपी सोंटू जैन नागपूर पोलिसांपेक्षा एक पाऊल पुढं असल्याचं दिसून येत आहे. आरोपी अनंत उर्फ सोंटू जैन विरुद्ध नागपूरच्या पोलिसांनी फास आवळायला सुरवात केल्याची माहिती समजताचं तो दुबईला पळून गेला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या गोंदिया येथील घरातून तब्बल 12 किलो सोनं, 294 किलो चांदी आणि सुमारे 17 कोटींची रोख जप्त केली होती.

आरोपीनं वाढवला पर्यटन व्हिसा : आरोपी अनंत उर्फ सोंटू जैन बिनदिक्कतपणानं देशाच्या बाहेर मौज करत आहे. केंद्रीय गृह विभाग व परराष्ट्र व्यवहार विभागाच्या मदतीनं त्याला भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा अनेकदा नागपूर पोलिसांनी केलेला आहे. मात्र, सोंटू जैननं त्याचा व्हिसा 14 ऑक्टोबरपर्यंत वाढवल्यानं नागपूर पोलीस करत असलेला दावा केवळ वल्गना असल्याचं ठरत आहे.

कोट्यवधी रुपयांची रोकड आणि ऐवज जप्त : अनंत उर्फ सोंटू जैनवर एका व्यापाऱ्याची 58 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात नागपूर पोलिसांनी 22 जुलैला गोंदिया इथं सोंटू जैनच्या घरी छापेमारी करुन तब्बल 16 कोटी 89 लाखांची रोकड, 12 किलो 403 ग्रॅम सोनं आणि 294 किलो चांदी असा 27 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर गोंदियामधील काही बँक लॉकरमधूनही 4.54 कोटी रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली होती.

हेही वाचा :

  1. Online Game Conversion Case: 'ऑनलाइन गेम' धर्मांतरण प्रकरण; घटनेचे धागेदोरे मुंबईमध्ये असल्याचे उघड
  2. Businessman Online Game Cheating: ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून व्यापाऱ्याची फसवणूक; बुकीच्या घरातून करोडोंचे घबाड जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.