नागपूर - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या वेगाने वाढतोय त्याच वेगाने वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन आणि प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. नागपूरमध्ये शंभर खाटांचे आयसीयूची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली.
राज्यातील अनेक शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये नागपूर शहरात देखील 4 रुग्ण आहेत. भविष्यात कोरोनाचा प्रसार वाढवायची शक्यता असल्याने नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात 100 खाटांची व्यवस्था असलेले स्वतंत्र आयसीयू वॉर्ड तयार करण्यात येत असल्याची माहिती नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. एवढेच नाही तर खासगी वैद्यकीय रुग्णालयांची देखील मदत घेतली जाणार असून तिथे दीड हजार खाटांची सुविधा करण्यात येत असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - घराबाहेर पडू नका, नितीन गडकरींचे जनतेला आवाहन