ETV Bharat / state

नागपूर जिल्हा परिषद निवडणूक : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच सेना उमेदवाराच्या जावयाची हत्या

जिल्हा परिषद निवडणुकीच्या एक रात्र आधीच कन्हान परिसरात हत्या झाली आहे. कन्हानमधील शिवसेनेचे उमेदवार डायनल शेंडे यांचे जावई संजू खडसे (वय-35)  यांचा चाकूने वार करून खून करण्यात आला आहे.

one brutally stabbed in nagpur
जिल्हा परिषद निवडणुकीच्या एक रात्र आधीच कन्हान परिसरात हत्या झाली आहे.
author img

By

Published : Jan 7, 2020, 11:01 AM IST

Updated : Jan 7, 2020, 12:33 PM IST

नागपूर - जिल्हा परिषद निवडणुकीच्या एक रात्र आधीच कन्हान परिसरात हत्या झाली आहे. कन्हानमधील प्रभाग क्रमांक ४ चे शिवसेनेचे उमेदवार डायनल शेंडे जावई संजू खडसे (वय-35) यांचा चाकूने वार करून खून करण्यात आला आहे. सोमवारी (दि.6जाने)ला रात्री संजू खडसे हे कन्हान शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील गौरव बारमध्ये दारू प्यायला बसले होते. त्यांच्या बाजूला अन्य तिघेजण दारू पित होते. या तिघांनी दारूच्या नशेत ग्लासची तोडफोड करण्यास सुरुवात केली.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या एक रात्र आधीच कन्हान परिसरात हत्या झाली आहे.

संजू खडसेंनी आरोपींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, भांडणाला सुरुवात झाल्याने ते बारच्या बाहेर आले. यानंतर तिघांनीही संजय यांना मारहाण करून चाकूने वार केले. संजू खडसे रक्तबंबाळ अवस्थेत कोसळताच तिघांनीही पळ काढला.

हेही वाचा : साताऱ्याजवळ परप्रांतीय क‍ामगार‍ाचा खून

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून संजू यांना कन्हानच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना कामठी येथील खासगी रुग्णालयामध्ये नेण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासणीनंतर मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Intro:नागपुर

जिल्हापरिषद मतदानाच्या पूर्व रात्री कन्हानमध्ये हत्या सेनेच्या जावयाला जीवे मारलं

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्व रात्री कन्हान परिसरात हत्या करण्यात आली आहे कन्हान चे शिवसेना उमेदवारे जावई ३५ वर्षीय संजू खडसे यांची चाकु ने वार करत हत्या करण्यात आली आहे.काल रात्री संजू खडसे हे कन्हान शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गौरव बारमध्ये एकटेच दारू पित बसले होते. त्यांच्या बाजूला अन्य तिघे दारू पित होते. अन्य तिघांनी दारु च्या नशेत ग्लासची तोडफोड करायला सुरुवात केली. संजू खडसे नि आरोपींची त्यांची समजूत काढण्याचा प्रयल केला.Body:संजू खडसे नि आरोपींची त्यांची समजूत काढण्याचा प्रयल केला.पण
भांडणाला सुरुवात झाल्याने ते बारच्या बाहेर आले. तिथे तिघांनीही संजय यांना मारहाण केली. आणि चाकूने वार केला संजू खडसे रक्तबंबाळ अवस्थेत कोसळताच दोघांनीही तिथून पळ
काढला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत संजू यांना कन्हान च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तिथे प्रथमोपचार
केल्यानंतर त्यांना कामठी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासणीअंती मृत घोषित केले.आरोपी ना ताब्यात घेतल असून पुढील तपास सुरू आहे

बाईट- जी.आर.काळे पोलीस निरीक्षक, कन्हान
Conclusion:
Last Updated : Jan 7, 2020, 12:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.