ETV Bharat / state

लिलाबाई वासनिक हत्या प्रकरणाचा उलगडा; हत्येप्रकरणी गुराख्याला अटक - nagpur crime news

नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील डोंगरमौदा गावात शेतावर जळालेल्या अवस्थेत मिळालेल्या वृद्ध महिलेच्या हत्येचे रहस्य उलगडले आहे. दोन दिवसांपूर्वी 65 वर्षांच्या लिलाबाई वासनिक नावाच्या महिलेच्या मृतदेहाचे काही तुकडे त्यांच्याच शेतात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळाले होते. लिलाबाई या वृद्ध महिलेचे जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

lilabai vasnik
लिलाबाई वासनिक
author img

By

Published : Dec 11, 2019, 4:16 PM IST

नागपूर - मुलासोबतच्या भांडणाचे सूड घेण्यासाठी त्याच्या वृद्ध आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील डोंगरमौदा येथील एका शेतात लिलाबाई वासनिक यांची हत्या करून मृतदेहाचे 5 तुकडे करून ते शेतात जाळल्याची घटना समोर आली होती. पोलिसांनी अवघ्या 24 तासात या हत्येच्या घटनेचा उलगडा केला आहे. कुही पोलिसांनी लिलाबाईच्या हत्येप्रकरणी एका गुराख्याला अटक केली आहे.

हेही वाचा - सत्ता परिवर्तनानंतर विकास होईल की अन्याय; विदर्भाच्या जनतेत संभ्रम

नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील डोंगरमौदा गावात शेतात जळालेल्या अवस्थेत मिळालेल्या वृद्ध महिलेच्या हत्येचे रहस्य उलगडले आहे. दोन दिवसांपूर्वी 65 वर्षांच्या लिलाबाई वासनिक नावाच्या महिलेच्या मृतदेहाचे काही तुकडे त्यांच्याच शेतात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळाले होते. लिलाबाई या वृद्ध महिलेचे जळालेले मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

लिलाबाई वासनिक गेल्या आठवड्यातच धानाच्या मळणीसाठी डोंगरमौदा या गावात त्यांच्या मुलासोबत आल्या होत्या. त्या दिवशी मुलगा राहुलचा गावातील राजेश सोनटक्के नावाच्या गुराख्यासोबत शेतात गुरे चारण्यावरून वाद झाला होता. तेव्हा पोलीस तक्रार देण्यात आली होती. दुसऱ्याच दिवशी मुलगा राहुल डोंगर मौदावरून नागपुरला परतला होता. मात्र, लिलाबाई डोंगरमौदालाच राहिल्या होत्या. 2, 3 दिवस वृद्ध लिलाबाईसोबत फोनवर संपर्क न झाल्यामुळे वासनिक कुटुंबीयांनी त्यांच्या शोधात पुन्हा डोंगरमौदा गाव गाठले होते.

हेही वाचा - नागपुरातील 'देवगिरी' जयंत पाटील, की अजित पवारांचे करणार स्वागत?

तेव्हा शेतातील गवताच्या ढिगात जळालेल्या अवस्थेतील गवत आणि हाडे दिसली होती. तर, काही अंतरावर केस व डोक्याची कवटीही दिसली होती. लिलाबाईच्या नातेवाईकांना त्यांच्या बांगड्या व चप्पलही तिथे आढळली होती. तेव्हाच त्यांच्या हत्येचा शोध पोलिसांनी सुरू केला होता.

राजेश सोनटक्केने मुलासोबतच्या वादात वृद्ध आईची हत्या केल्याची कबुली दिली आहे. धक्कादायक म्हणजे, राजेशने लिलाबाईची हत्या डोक्यावर काठी मारून केली, त्यानंतर मृतदेह गवतात जाळला. दुसऱ्या दिवसापर्यंत अर्धाच मृतदेह जळाल्यामुळे राजेशने मोठ्या कोयत्याने मृतदेहाचे अनेक तुकडे करत ते शेतात वेगवेगळ्या ठिकाणी जाळले होते. दरम्यान, पोलिसांनी राजेश सोनटक्केला अटक केली आहे.

Intro:मुलासोबतच्या भांडणाचे सूड त्याच्या वृद्ध आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे... नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील डोंगर मौदा येथील एका शेतात लीलाबाई वासनिक यांची हत्या करून मृतदेहाचे 5 तुकडे करून ते शेतात जाळ्याची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 24 तासात या हत्येच्या घटनेचा उलगडा केला आहे...कुही पोलिसांनी लिलाबाईच्या हत्येप्रकरणी एका गुराख्याला अटक केली आहे.
Body:नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील डोंगर मौदा गावात शेतावर जळालेल्या अवस्थेत मिळालेल्या वृद्ध महिलेच्या हत्येचे रहस्य उलगडले आहे.. दोन दिवसांपूर्वी 65 वर्षांच्या लीलाबाई वासनिक नावाच्या महिलेचे मृतदेहाचे काही तुकडे तिच्याच शेतात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळाले होते..
डोंगरमौदा गावात शेतात दोन दिवसांपूर्वी लिलाबाई या वृद्ध महिलेचे जळालेले मृतदेह आढळल्याने खळबळ माजली होती.. लीलाबाई वासनिक गेल्या आठवड्यातच धानाच्या मळणीसाठी डोंगरमौदा या गावात त्यांच्या मुलासोबत आल्या होत्या.. त्या दिवशी मुलगा राहुलचा गावातील राजेश सोनटक्के नावाच्या गुराख्यासोबत शेतात गुरे चारण्याच्या मुद्द्यावर वाद झाले होते.. तेव्हा पोलीस तक्रार देण्यात आली होती..दुसऱ्याच दिवशी मुलगा राहुल डोंगरमौदा वरून नागपुरला परतला होता....मात्र, लीलाबाई डोंगरमौदालाच राहिल्या होत्या..2 - 3 दिवस वृद्ध लिलाबाई सोबत फोन वर संपर्क न झाल्यामुळे वासनिक कुटुंबियांनी त्यांच्या शोधात पुन्हा डोंगरमौदा गाव गाठले होते...
तेव्हा शेतातील गवताच्या ढिगात जळालेल्या अवस्थेतील गवत आणि हाडे दिसली होती तर काही अंतरावर केस व डोक्याची कवटी ही दिसली होती... लिलाबाईच्या नातेवाईकांना त्यांच्या बांगड्या व चप्पल ही तिथे आढळल्या होत्या, तेव्हाच त्यांच्या हत्येचा शोध पोलिसांनी सुरू केला होता..
आज राजेश सोनटक्के ने मुलासोबतच्या वादात वृद्ध आईची हत्या केल्याची कबुली दिली आहे..धक्कादायक म्हणजे राजेश ने लिलाबाई ची हत्या डोक्यावर काठी मारून केली, त्यानंतर मृतदेह गवतात जाळले..
दुसऱ्या दिवशी पर्यंत अर्धेच मृतदेह जळाल्यामुळे राजेश ने मोठ्या कोयत्याने मृतदेहाचे अनेक तुकडे करत ते शेतात वेगवेगळ्या ठिकाणी जाळले होते..
पोलिसांनी राजेश सोनटक्के ला अटक केली आहे...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.