ETV Bharat / state

Raj Thackery Visit Nagpur : राज ठाकरे नागपूरच्या दौऱ्यावर येताच, मुख्य पदाधिकाऱ्याचा राजीनामा - मनसे अध्यक्ष राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचा आज एक दिवसीय नागपूर दौरा (Raj Thackery Visit Nagpur) आहे. परंतु राज ठाकरे यांच्या दौऱ्या पूर्वीच मनसेला नागपुरात धक्का बसला आहे. उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाचे विभाग अध्यक्ष महेश माने (MNS chief officer Mahesh Mane ) यांनी पदाचा राजीनामा (MNS chief officer of North Nagpur resigns) दिला आहे. (Latest news from Nagpur)

Mahesh Mane Resign
मनसे पदाधिकारी महेश माने यांचा राजीनामा
author img

By

Published : Dec 23, 2022, 1:23 PM IST

Updated : Dec 23, 2022, 2:34 PM IST

नागपूर : मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचा आज नागपूर दौरा (Raj Thackery Visit Nagpur)आले आहेत. या नागपूर दौऱ्यात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना ते नियुक्ती पत्र प्रदान करणार आहेत; परंतु राज यांच्या दौऱ्याच्या वेळीच मनसे पदाधिकाऱ्यांने राजीनामा दिला आहे. महेश माने (MNS chief officer Mahesh Mane ) असे या पदाधिकाऱ्यांचे नाव असून ते उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघाचे विभाग अध्यक्ष होते. पक्षात करण्यात आलेले फेरबदल व नवे नियुक्त केलेले पदाधिकारी दबाव तंत्राचा वापर करीत असल्याचे आरोप राजीनामा पत्रात केले आहे. सोबतच पक्षाचे काही पदाधिकारी खंडणी वसुली करीत असल्याचा गंभीर आरोपही महेश माने यांनी केला आहे. पक्षाचे वातावरण गढूळ झाल्याने पक्षाचा राजीनामा (MNS chief officer of North Nagpur resigns) देत असल्याचे महेश माने यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे. (Latest news from Nagpur)

मानेंच्या राजीनाम्याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष : मनपाच्या दृष्टीने मनसेला धक्का: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राज ठाकरे नागपुरात असताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनावर करण्यात आलेले गंभीर आरोप आणि पक्षाचा राजीनामा निश्चितच महत्वपूर्ण मानले जात आहे.

नागपूर मनपा निडवणुकीची तयारी ?
सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. अधिवेशनामुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते नागपुरात आहेत. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे नागपुरात राज ठाकरे कोणाला भेटणार का? याबाबतची चर्चा देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. याआधी सप्टेंबर महिन्यात राज ठाकरे यांनी नागपूर दौरा केला होता. तेव्हा त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले होते. तेव्हा त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. तसेच एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज ठाकरे एकत्र आले होते. राज ठाकरे नागपूर मनपा निवडणुकीत विजयी पताका रोवण्यासाठी इतर पक्षांशी हातमिळवणी करणार का, की मनसे स्वबळावर निवडणूक लढणार याकडे राजकारण्यांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे दुसऱ्यांदा नागपुरात : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात दौरे सुरू केले आहेत. पक्ष संघटना वाढवण्याच्या औचित्यावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांसी ते संवाद साधत आहेत. पुढच्या काही महिन्यांमध्ये नागपुरात महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीसाठी राज ठाकरे नागपुरात आले आहेत. तीन महिन्यात दुसऱ्यांदा राज ठाकरे नागपूरमध्ये येत असल्याने त्यांच्या या दौऱ्याला महत्व आहे.

Last Updated : Dec 23, 2022, 2:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.