नागपूर - नागपुरात सकाळपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुधवार रात्रीपासून शहरातील वातावरण ढगाळ होते. काही ठिकाणी जोराचा वाराही होता. आज (गुरुवारी) सकाळी आठ वाजता पाऊस सुरू झाला. विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
नागपुरात कोरोनाचे थैमान सुरु असताना ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस - नागपूर अवकाळी पाऊस न्यूज
अरबी समुद्र आणि दक्षिणेकडून वाहणारे बाष्पयुक्त वारे एकत्र आल्याने विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार नागपूर शहरात आज सकाळी पाऊस झाला.
नागपूर पाऊस अपडेट
नागपूर - नागपुरात सकाळपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुधवार रात्रीपासून शहरातील वातावरण ढगाळ होते. काही ठिकाणी जोराचा वाराही होता. आज (गुरुवारी) सकाळी आठ वाजता पाऊस सुरू झाला. विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
Last Updated : Mar 18, 2021, 3:11 PM IST