नागपूर - राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. नागपुरात दररोज सरासरी मोडीत निघत आहे. प्रशासनासमोर कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या कमी करण्याचे आव्हान निर्माण होत आहे. नागपूर जिल्ह्यात 3 हजार 796 रूग्ण आढळले असून 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, पूर्व विदर्भातील इतर जिल्ह्यातही कोरोनाचे रूग्ण वाढत असून काल(गुरुवार) 4 हजार 501 रुग्णाची नोंद झाली तर 30 जणांचा मृत्यू झाला.
पूर्व विदर्भात 30 जणांचा कोरोनाने बळी -
पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात बाधित रूग्णांची संख्या अधिक आहे. नागपूर जिल्ह्यात 3 हजार 796 बाधितांची भर पडली असून 1 हजार 277 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. वर्ध्यात 374 बाधित असून 364 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 136 नवे रूग्ण आढळले असून 97 जण कोरोनामुक्त झाले आहेत. भंडारा 99, गोंदिया 51 तर गडचिरोली जिल्ह्यात 45 बाधितांची भर पडली आहे. नागपूर जिल्ह्यात 23, चंद्रपूर जिल्ह्यात 1 तर वर्ध्यात 6 अशा 30 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - अँटिलिया प्रकरण: पाचवी मर्सिडीज गाडी 'एनआयए'ने केली जप्त