नागपूर - जिल्ह्यातील उमरेड आणि कुही तालुक्यातील काही गावांमध्ये डान्स हंगामा ( Dance Hangama Umred ) नावाची जाहिरात करून बंद शामीयानांमध्ये नग्न डान्सचे ( Nude Dance in Nagpur ) अश्लील प्रकार सुरू असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. न्यूड डान्सचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उजेडात आला आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांच्या ( Nagpur Rural Police ) नाकावर टिच्चून अश्लीलता आणि बीभत्सपणाचा हा खेळ सुरू होता. मात्र पोलिसांना याची साधी माहिती देखील मिळाली नव्हती. या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसानी तिघांना गुन्हा दाखल केला आहे.
तिघांवर गुन्हा दाखल -
चंद्रशेखर उर्फ लाला प्रभुजी मांढरे, सुरज निळकंठ नागपूरे, अनिल शालीकराम दमके या तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस स्टेशन उमरेड येथे कलम २९४, ११४, १८८, ३४ भा.द.वि. सह कलम १३१(अ), ११०,११२,११७ म.पो.का. अन्वये गुन्हा नोंद करुन गुन्ह्यातील तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांना कानो-कान नव्हती खबर -
सध्या ग्रामीण भागात शंकरपटाचे आयोजन केले जात आहे. यामध्ये तरुण वर्ग उत्साहाने भाग घेतो. दिवसभर शंकरपटची मज्जा घेतल्यानंतर तरुणांचे पाय बंद शामीयानांकडे वळू लागली आहे. या बंद शामीयानामध्ये अश्लीलता आणि निर्लज्यपणाचा उच्चांकी कळस गाठला जातो. न्यूड डान्स बघण्यासाठी रोज गर्दी वाढू लागली होती. मात्र पोलिसांना याची कानो-कान खबर नव्हती. अखेर या आयोजनांमध्ये सुरू असलेला नंगा नाच व्हिडिओच्या माध्यमातून बाहेर येताच एकच खळबळ उडाली आहे.
बाम्हणी गावातील प्रकार -
व्हायरल झालेला हा व्हिडीओ नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्याच्या बाम्हणी गावातील आहे. बाम्हणी मध्ये काही दिवसांपूर्वी डान्स हंगाम नामक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बाम्हणी गावचे सरपंच रितेश आंबोने यांना या संदर्भात संपूर्ण साधला असता ते म्हणाले की मला या डान्स हंगामा कार्यक्रमाच्या आयोजन संदर्भात कुठलीही माहिती नव्हती, कोरोना प्रतिबंधक नियम लागू असल्याने अश्या कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी देता येत नाही. त्यामुळे आम्ही या कार्यक्रमाला परवानगी देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं सरपंच रितेश आंबोने म्हणाले आहेत. डान्स हंगामाच्या नावावर अश्लील नृत्याचा व्हिडिओ नागपूर जिल्ह्यात वेगाने व्हायरल होत आहेत. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात हॉट हंगामा, इलेक्स जुली के हंगामे, सिम्पल हंगामे अश्या नावांनी डान्स हंगामा कार्यक्रमाचे आयोजन गावोवावी केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. बाम्हणी गावातील डान्स हंगामाच्या नावावर अश्लील नृत्याचा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर आता अन्य आजू बाजूच्या गावातील डान्स हंगामाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
डान्स हंगामाच्या जाहिराती -
गेल्या काही दिवसांपासून उमरेड आणि कुही तालुक्यातील अनेक गावांमधील घरांच्या भिंतींवर डान्स हंगामा नावाच्या कार्यक्रमाच्या जाहिराती लावण्यात आल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पब्लिसिटी जोरात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
सरपंच देणार तक्रार -
उमरेड तालुक्याच्या बाम्हणी गावातील डान्स हंगामा कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा आले होते, या गावचे सरपंच रितेश आंबोने यांनी दिलेल्या माहिती नुसार त्यांना या कार्यक्रमाच्या आयोजना संदर्भात कोणतीही माहिती नव्हती, मात्र आता व्हिडीओ वायरल झाल्यानंतर या घटनेची तक्रार उमरेड पोलीस ठाण्यात करणार असल्याची माहिती त्यांनी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधी सोबत फोन वरून बोलताना दिली.