ETV Bharat / state

५४ गुन्ह्यांची नोंद असलेला अट्टल सोनसाखळी चोर पकडण्यात पोलिसांना यश - dcp rajtilak roushan

स्वरूप लोखंडे असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. स्वरूप हा वयाच्या १७ वर्षापासून गुन्हेगारीत सक्रिय आहे. बऱ्याच दिवसांपासून स्वरूप पोलिसांच्या 'हिट लिस्ट'वर होता. तो अत्यंत हुशार असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता. मात्र, त्याची संपूर्ण हुशारी शहर पोलिसांनी उघडी पाडली आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या स्वरूप लोखंडे याचे छायाचित्र
author img

By

Published : Jul 18, 2019, 9:03 AM IST

Updated : Jul 18, 2019, 9:23 AM IST

नागपूर- शहर पोलिसांना अट्टल सोनसाखळी चोरट्यास जेरबंद करण्यात यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर एक दोन नव्हे तर वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ५४ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्या कडून ७६ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला.

प्रकरणाबद्दल माहिती देताना डीसीपी राजतिलक रोशन

स्वरूप लोखंडे असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. स्वरूप हा वयाच्या १७ वर्षापासून गुन्हेगारीत सक्रिय आहे. बऱ्याच दिवसांपासून स्वरूप पोलिसांच्या हिट लिस्टवर होता. तो अत्यंत हुशार असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता. मात्र, त्याची संपूर्ण हुशारी शहर पोलिसांनी उघडी पाडली आहे. अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये स्वरूप सदृष्य आरोपी दिसत होता, मात्र पोलिसांना तो सापडत नव्हता. स्वरूप चोरी करताना हेल्मेट घालून वेगवेगळ्या मोटर सायकलचा वापर करायचा. त्यामुळे त्याला पकडने कठीण झाले होते.

काही केल्या तो सापडत नसल्याने पोलिसांनी देखील शिताफीने आपली शोध चक्रे फिरवायला सुरुवात केली. पोलिसांनी सुरुवातीला त्याची माहिती गोळा करायला सुरुवात केली नंतर सापळा रचून त्याला पकडण्यात यश मिळविले. त्याच बरोबर आरोपी ज्या व्यक्तीकडे सोनसाखळी विकायचा, त्याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी स्वरूपकडून ७६ ग्रॅम सोन्याची चैन, मोटार सायकल आणि सोने विकून घेतलेल्या वस्तू जप्त केल्या आहेत.

Intro:राज्यात सोनसाखळी चोरीच्या सर्वाधिक घटना नागपुरात घडतात हे या आधी सुद्धा अनेक वेळा सिद्ध झाले आहे...खास करून सकाळी मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या महिलांना हे चोर लुटायचे त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते,मात्र नागपूर पोलिसांनी सोनसाखळी चोरणार्या सर्वात मोठ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत...अटक करण्यात आलेल्या आरोपीवर एक दोन नव्हे तर तब्बल 54 गुन्हे दाखल आहेत,पोलिसांनी कडून ७६ ग्राम सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा माळ जप्त केला आहे Body:नागपूर पोलिसांनी स्वरूप लोखंडे नामक अट्टल सोनसाखळी चोराला पकडण्यात यश मिळविले आहे, स्वरूप वर एक दोन नाही तर ५४ गुन्हे दाखल आहेत,तो बऱ्याच दिवसांपासून पोलिसांच्या हिट लिस्टवर होता ... मात्र स्वरूप लोखंडे अत्यंत हुशार असल्याने पोलिसांच्या हाती लागतच नव्हता,मात्र त्याची संपूर्ण हुशारी पोलिसांनी उघडी पडली आहे....पोलिसांच्या कस्टडीत असलेला हा तो चोरटा आहे ज्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक दोन नाही तर ५४ गुहे दाखल आहेत ... याच नाव आहे स्वरूप लोखंडे .. स्वरूप लोखंडे हा वयाच्या १७ व्य वर्षांपासून गुन्हेगारीत सक्रिय आहे ... सोनसाखळी चोरी हा त्याचा शौक आहे ... नागपूर शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या पोलिसांच्या सुद्धा नाकीनऊ आलं होत ... अनेक सीसीटीव्ही मध्ये याच्या सारखा आरोपी दिसत होता मात्र सापडत नव्हता .. चोरी करताना तो हेल्मेट घालून वेगवेगळ्या मोटर सायकलचा वापर करायचा ... आरोपीने सोनसाखळी चोरी केल्यानंतर ते विकण्याची व्यवस्था सुद्धा करून ठेवली होती ... पोलीस अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते पण काही केल्या तो गवसत नसल्याने पोलिसांनी देखील शिताफीने आपली शोध चक्र फिरवायला सुरवात केली....सुरवातीला त्याची माहिती गोळा करायला सुरवात केली आणि सापळा रचून त्याला पकडण्यात यश मिळविलं त्याच्या कडून ७६ ग्राम सोन्याच्या चैन मोटार सायकल आणि सोन विकून त्याने घेतलेल्या वस्तू पोलिसांनी जप्त केली ..

बाईट -- राजतिलक रोशन -- डीसीपी

Conclusion:
Last Updated : Jul 18, 2019, 9:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.