नागपूर - महाराष्ट्रात नैसर्गिक संकटाशी शेतकरी लढत असताना दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेजण राज्याचा कारभार सांभाळत आहेत. त्यावर उपाययोजना करण्याचे सोडून महाविकास आघाडीचे सरकार ( Ajit Pawar On MVA Government ) स्थापन झाल्यावर पाचच मंत्री होते असे उत्तर देताय. पण हे उत्तर नसून शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल हे उत्तर पाहिजे असा टोला विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ( Ajit Pawar Criticized Devendra Fadnavis )लावला. ते नागपूरता माध्यमांशी बोलत होते. आज वर्धा यवतमाळ जिल्ह्याच्या धावता दौरा करणार ( Ajit Pawar Vidarbha Tour ) आहेत.
फडणवीसांचे वक्तव्य चुकीचे - उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या आरोपांना अजित पवार यांनी खोडू काढले ( Devendra Fadnavis Allegations On AJit Pawar ) आहे. आमच्या सरकारमध्ये पाच लोक होते हे फडणवीसांचे वक्तव्य चुकीचे आहे. त्यावेळी सात लोकांनी शपथ घेतली होती. ते सर्वच दिग्गज नेते असून प्रत्येकात मुख्यमंत्री होण्याची क्षमता असणारे नेते होते. तसेच त्यावेळेस राज्यावर कुठलेही संकट नव्हते. आता परिस्थिती विपरीत आहे. नैसर्गिक संकटात शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी करतात. पण प्रश्न विचारला की महाविकास आघाडी सरकारमध्ये पाचच मंत्री होते असं उत्तर देत आहेत. अनेक वर्ष सरकारमध्ये असल्याने त्या अनुभवावरून सरकारमध्ये असताना आणि विरोधात असताना कसं काम करायचं याची चांगली जाणीव मला आहे असे अजित पवार म्हणालेत.
दोन जणांचे सरकर म्हणत टोला - त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वास्तविक परिस्थिती समजून घेण्याचे काम करत आहे. स्वतःहून पूरग्रस्त जिल्ह्याचा दौरा करायला आलो आहे. मला राजकारण करायचे नाही. पण जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन वास्तविक परिस्थिती समजून घेण्याचे काम करत आहे. अजून ही पंचनामे झालेले नाही. काही मृतकांच्या कुटुंबियांना पैसे मिळाले आहे. पण जनावरे मृत झाली त्यांना अजून काहीही मदत मिळाली नाही. शेतकरी आत्महत्या करतो. ताबडतोब गरजवंतांना मदत कशी मिळेल. दुबार पेरणीसाठी बियाणे कसे मिळेल याचे उत्तरे दिले पाहिजेत. पण त्यासंदर्भात कोणी बोलत नाही असा टोला ही शिंदे फडणवीस दोन जणांचे सरकर म्हणत लगावला.