नागपूर : भाजपने राज्यात कुठले ही ऑपरेशन लोटस केलेले नाही. (Maharashtra Political Crisis) आम्हाला त्याची गरजच भासली नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आले ते उद्धव ठाकरे यांना कंटाळून आले. (Bawankule On Operation Lotus) तर अजित पवार यांच्यासोबत जे आले ते मोदींचे नऊ वर्षांचे कामकाज पाहून आले आहेत. भारतीय जनता पक्षाने कोणतीही फोडाफोडी केली नाही. आमचे संस्कार घर फोडण्याचे नाहीत. चांगले सरकार बनले आहे. एकनाथ शिंदेंसारखा मर्द नेता मुख्यमंत्री आहे. सोबत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यासारखे नेते आहेत.
'तो' निर्णय मुख्यमंत्री घेतील : शरद पवार काय म्हणतात त्याबद्दल बोलणार नाही. मात्र, राजकारणात बेरजेला महत्त्व आहे. या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे. त्यांचा अनुभव, देवेंद्र फडणवीस यांचा अनुभव अजित पवार यांचा अनुभव या सरकारच्या कामात येईल. कुणाला कोणते खाते द्यायचे याबद्दल मुख्यमंत्री बोलतील तो अधिकार त्यांचा आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
आणखी लोक आमच्या सोबत येतील : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार संपूर्ण जगाने स्वीकारले आहेत. राज्यात आणि देशात अनेक लोक आमच्यासोबत येण्यासाठी तयार आहेत. २०२४ पर्यंत आणखी काही लोकांचा पाठिंबा आम्हाला मिळताना दिसेल, अशी अपेक्षाही बावनकुळेंनी व्यक्त केली.
हिंदुत्वाचा विचार महत्त्वाचा आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातले आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील सर्व आमदार एकत्र का आले आहेत, हे समजून घेतले पाहिजे. ते मंत्रीपदासाठी समोर आलेले नाहीत. हिंदुत्वाचा विचार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राचा विकासाचा विचार महत्त्वाचा आहे. जे आमदार आमच्यासोबत आहेत, त्यांचा विचार मोदींच्या नेतृत्वात भारत घडवण्याचा आहे. देशहिताचा विचार करून तडजोड करावी लागते. मंत्रिपद मिळाले की नाही, यापेक्षा देशहित महत्त्वाचे आहे. मंत्रीपदासाठी आमचे कार्यकर्ते किंवा आमदार काम करत नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळ विस्ताराचा संपूर्ण अधिकार एकनाथ शिंदे यांचा आहे. त्यांच्यासोबत आलेले सर्व आमदार सरकारमध्ये योग्य पद्धतीने काम करत आहेत. एकनाथ शिंदे जे ठरवतील तेच होणार आहे. - चंद्रशेखर बावनकुळे
शरद पवारांनी जे पेरलं तेचं उगवलं: शरद पवार यापूर्वीही रस्त्यावर उतरले आहे. हा जो खेळ सुरू झाला तो शरद पवार यांनी सुरू केला. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसून सुरुवात कोणी केली. फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शरद पवार यांनी अनेक युक्त्या केल्या. जे पेरलं तेच उगवलयं, अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली.
हेही वाचा: