ETV Bharat / state

Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरी धमकी प्रकरण; खटला मुंबईला स्थलांतरित करण्यासाठी एनआयएची उच्च न्यायालयात धाव - Nitin Gadkari

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागितल्याचे प्रकरण नागपूर येथील न्यायालयात सुरू आहे. मात्र हा खटला मुंबईला स्थलांतरित करण्यात यावा, या मागणीसाठी एनआयएने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केले आहे. न्यायालयाने या अपिलावर सुनावणी करत राज्य सरकार व मुख्य आरोपी जयेश पुजारी यांना नोटीस बजावली. यावर ३० ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Nitin Gadkari Threat Case
नितीन गडकरी धमकी प्रकरण
author img

By

Published : Aug 5, 2023, 8:49 AM IST

Updated : Aug 5, 2023, 12:25 PM IST

नागपूर : नितीन गडकरी धमकी प्रकरणाचा खटला मुंबईत स्थलांतरित करण्यासाठी एनआयएने मागील महिन्यातच नागपूरमधील विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यात त्यांनी नितीन गडकरी खंडणी प्रकरण मुंबईला स्थलांतरित करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावेळी विशेष सत्र न्यायालयाने एनआयएची मागणी नामंजूर केली. न्यायालयाने एनआयएला उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे एनआयएकडून हा खटला मुंबईत स्थलांतरित करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे.

आरोपीचे नागपूर कनेक्शन : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील खामला येथे असलेल्या जनसंपर्क कार्यालयात 14 जानेवारी आणि 21 मार्चला बेळगावच्या तुरुंगातून जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागण्यासाठी फोन आले होते. सुरुवातीला या प्रकरणात जयेश कांथा नामक कुख्यात गुंडाचा सहभाग आढळला होता, तो बेळगाव कारागृहात कैद होता. जयेश कांथाला २०१६ मध्ये खुनाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा झाली होती. त्यानंतर तपासात अफसर पाशा नामक दहशतवाद्याचे नाव पुढे आले. नागपूर पोलिसांनी अफसर पाशाला बेळगाव तुरुंगातून नागपूरला आणले. जयेश कांथा आणि अफसर पाशाची समोरासमोर बसवून चौकशी केली. त्यात आरोपीचे नागपूर कनेक्शन पुढे आले होते. सध्या दोन्ही आरोपी नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत.

अफसर पाशाचे दहशतवादी कनेक्शन : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन शंभर कोटींची खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणातील मास्टरमाईंड दहशतवादी बशीरुद्दीन नूर मोहम्मद उर्फ अफसर पाशाला 15 जुलै रोजी बेळगाव येथील तुरुंगातून अटक केली होती. अटक केल्यानंतर पहिल्यांदा 4 दिवस, नंतर ३ दिवस, त्यानंतर आणखी 3 दिवस असे एकूण 10 दिवस पोलीस कोठडीत त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याचे नागपूर कनेक्शन, दहशतवादी संघटनाशी असलेले संबंध उघड झाले होते.

पोलिसांनी दिले ना हरकत प्रमाणपत्र : नितीन गडकरी यांना मिळालेल्या धमकी आणि खंडणी प्रकरणात दहशतवादी कनेक्शन समोर आल्यामुळे एनआयएकडे या प्रकरणाचा तपास सोपावण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. याला नागपूर पोलिसांची परवानगी आहे, म्हणून नागपूर पोलिसांनी ना हरकत प्रमाणपत्र दिल्याची माहिती नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. न्यायालयाने परवानगी दिल्यास पुढील काही दिवसात हा तपास मुंबई एनआयएकडे वर्ग होईल, असे देखील ते म्हणाले आहेत.

अफसर पाशावर बॉम्बस्फोटाचे आरोप : मास्टर माईंड असलेला कुख्यात दहशतवादी बशीरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशा लष्कर ए तोयबाचा कुख्यात दहशतवादी आहे. तो 2014 पासून बेळगावच्या तुरुंगात कैदेत होता. बेळगावच्या तुरुंगातच त्याने जयेश पुजारी उर्फ शाकीरचे ब्रेन वॉश करत त्याचा दहशतवादी नेटवर्कसाठी वापर करुन घेतला होता. अफसर पाशावर 2003 च्या ढाका आणि 2005 च्या बंगळुरू बॉम्ब ब्लास्टचा आरोप आहे. अफसर पाशाने जयेशला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करुन खंडणी मागण्यासाठी प्रवृत्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. Parliament Monsoon Session 2023 : निशिकांत दुबेंच्या 'सुपरफास्ट' प्रश्नांना नितीन गडकरींनी लावले ब्रेक; म्हणाले उपायोजना करुन दोषी अधिकाऱ्यांवर करणार कारवाई
  2. Terrorist Afsar Pasha : गडकरींना खंडणीची धमकी देणाऱ्या दहशतवाद्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी
  3. Nitin Gadkari Threat Case: नितीन गडकरी धमकी प्रकरण; दहशतवादी अफसर पाशाचे नागपूर कनेक्शन उघड

Last Updated : Aug 5, 2023, 12:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.