ETV Bharat / state

Nitin Gadkari Threat Case: नितीन गडकरी धमकी प्रकरणात चौकशी दरम्यान अफसर पाशाच्या छातीत दुखू लागले, उपचार सुरू

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या धमकी आणि खंडणी प्रकरणामागील मास्टरमाईंड दहशतवाद बशीरुद्दीन नूर मोहम्मद उर्फ अफसर पाशाची नागपूर पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. चौकशी दरम्यान त्याच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्याला तातडीने मेडिकल रुग्णालयात नेण्यात आले असल्याची माहिती पुढे आली आहे.

Nitin Gadkari Threat Case
नितीन गडकरी धमकी प्रकरण
author img

By

Published : Jul 18, 2023, 9:08 AM IST

नितीन गडकरी धमकी प्रकरण

नागपूर : नितीन गडकरी धमकी आणि खंडणी प्रकरणामागील मास्टरमाईंड दहशतवादी बशीरुद्दीन नूर मोहम्मद उर्फ अफसर पाशाची रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. जयेश पुजारी याच्या चौकशी दरम्यान अफसर पाशाची लिंक समोर आली होती. नागपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाशाला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पाशाने घेतले होते कार दुरुस्तीचे प्रशिक्षण : दहशतवादी बशीरुद्दीन नूर मोहम्मद उर्फ अफसर पाशाने कार मेकॅनिकचे प्रशिक्षण घेतले होते. तो काही काळ सौदी अरेबियात नोकरीला देखील होता. सौदीमध्ये त्याचा पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना 'लष्कर ए तोयबा'शी संबंध आला होता. अफसर पाशा हा बंगळूरूतील एका कामगाराचा मुलगा आहे. सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्याने कार दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती समोर आली आहे.

दहशतवादी कनेक्शन उघड : नितीन गडकरी यांना मिळालेल्या धमकी आणि खंडणी प्रकरणात दहशतवादी कनेक्शन उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. एनआयएने प्रकरणाचा तपास सोपावण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. आज यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. नितीन गडकरी धमकी प्रकरणातचा मास्टर माईंड कुख्यात दहशतवादी बशीरुद्दीन नूर अहमदला उर्फ अफसर पाशा आणि जयेश कांथा उर्फ पुजारी सध्या नागपूर पोलिसांच्या कोठडीत आहे.

पोलिसांनी दिले ना हरकत प्रमाणपत्र : नितीन गडकरी यांना मिळालेल्या धमकी आणि खंडणी प्रकरणात दहशतवादी कनेक्शन समोर आले आहे. त्यामुळे एनआयएकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. याला नागपूर पोलिसांची परवानगी आहे, म्हणुन नागपूर पोलिसांनी 'ना हरकत प्रमाणपत्र' दिल्याची माहिती नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. न्यायालयाने परवानगी दिल्यास पुढील काही दिवसांत हा तपास एनआयएकडे वर्ग होईल, असे देखील ते म्हणाले आहेत.

अफसर पाशाचे नागपूर कनेक्शन : अफसर पाशाचे नागपूर कनेक्शन देखील चौकशी दरम्यान उघड झाले आहे. तो २००३ ते २००४ मध्ये तो नागपुरात वास्तव्याला होता. चौकशी दरम्यान तो वारंवार उत्तरे बदलत असल्याची माहिती पुढे आली आहे. एनआयएचे पथक देखील त्याची चौकशी करणार असल्याची शक्यता आहे. १९ जुलैपर्यंत अफसर पाशाला पोलीस कोठडी मिळाली आहे.

अफसर पाशावर बॉम्बस्फोटाचे आरोप : मास्टर माईंड कुख्यात दहशतवादी बशीरुद्दीन नूर अहमदला उर्फ अफसर पाशा 'लष्कर ए तोयबा'चा कुख्यात दहशतवादी आहे. तो २०१४ पासून बेळगावच्या तुरुंगात कैदेत होता. बेळगावच्या तुरुंगातच त्याने जयेश पुजारी उर्फ शाकीरचे ब्रेन वॉश करत त्याचा दहशतवादी नेटवर्कसाठी वापर करून घेतला होता. अफसर पाशावर २००३ च्या ढाका आणि २००५ च्या बंगळूरु बॉम्ब स्फोटाचा आरोप आहे. अफसर पाशाने जयेशला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून खंडणी मागण्यासाठी प्रवृत्त केले होते.

हेही वाचा :

  1. Nitin Gadkari Threat Case: नितीन गडकरी धमकी प्रकरण; दहशतवादी अफसर पाशाचे नागपूर कनेक्शन उघड
  2. Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरी यांच्या धमकी प्रकरणातील, अफसर पाशा नागपूर पोलिसांच्या ताब्यात
  3. Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरी धमकी प्रकरणाच्या तपासासाठी एनआयएचा विशेष कोर्टात अर्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.