नागपूर : गरीब माणसाला जर बँकेतून पैसा मिळाला, तर नक्कीच त्याला याचा फायदा होतो. सगळे रेकॉर्ड तयार झाले आहेत. जनधन योजनेमध्ये आपले साडेतीन करोड अकाउंट होते. आता 49 कोटी झाले आहेत आणि प्रत्येकाचे रेटिंग माहीत होते. त्यामुळे स्वाभाविकपणे येणाऱ्या काळामध्ये या रेटिंगच्या आधारावर तुम्ही बँकेत नीट व्यवहार केला, तर बँक देखील तुम्हाला पैसे देईल. शेवटी बँकेतला पैसा देखील समाजाचा आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.
एक विनंती आपल्या सगळ्यांना करणार आहे की नोकरी मागणारे नाही, तर नोकरी देणारे व्हा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
रोजगार देणारे व्हा : आपल्या देशासमोर सर्वात मोठी समस्या रोजगाराची आहे. रोजगाराचा संबंध हा आपल्यातील गुणवत्तेशी आहे. आपल्यामध्ये कोणते स्किल आहे, की ज्याच्या आधारावर आपण रोजगार प्राप्त करू शकतो. अनेक कला आहेत, ज्या अनेक लोकांमध्ये आहेत, त्या कलांना विकसित करणे, प्रशिक्षित करणे आणि त्या पर्टिक्युलर कौशल्यामध्ये त्यांना एक्सपर्ट करणे खूप आवश्यक आहे.
स्वतःच्या जीवनाचे स्वतःच शिल्पकार व्हा : नागपुरातील सोनपापडी बनवणारा मजूर आज उत्तम दर्जाची सोनपापडी बनवतो, त्याला ती कला अवगत आहे. अश्याच एकाने या कलेला गुणवत्तेची जोड दिली, त्यामुळे तो सोनपापडी तयार करणारा मजूर सोनपापडी कारखान्याचा मालक झाला. आज या कलेच्या जोरावर तो चार ते पाच कोटींचा व्यवसाय करत आहे. त्यामुळे रोजगार मागण्यापेक्षा स्वतःतील कलागुणांना विकसित करून रोजगार देणारे व्हावे, इतर तरुणांना सुद्धा प्रोत्साहन देण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये स्पेशल लायझेशन आणि एक्सपर्टीज आहे, ज्यांना असे वाटते की मला सगळे समजते. त्यांच्या आयुष्याचा विकास संपलेला असतो आणि म्हणून आपण सतत शिकत राहायला पाहिजे.
हेही वाचा :
Nitin Gadkari : भारतातील रस्ते जनतेची संपत्ती, आम्ही सर्व जनतेचे सेवक - नितीन गडकरी
Nitin Gadkari Met Manohar Joshi: नितीन गडकरींनी घेतली हिंदुजा रुग्णालयात मनोहर जोशींची भेट