नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे. याचिककर्ता मनोहर डबरासे यांना ईव्हीएममधील बिघाडासंदर्भात सबळ पुरावे देता न आल्याने न्यायालयाने याचिका फेटाळल्याचे निकालात नमूद केले आहे.
हेही वाचा - उमा भारतींनी केली मोदींची छत्रपतीशी तुलना, म्हणाल्या... ‘छत्रपती मोदी जिंदाबाद!’
गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांनी नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. गडकरींनी 2 लाख 25 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. लोकसभा निवडणुकीत दोषपूर्ण ईव्हीएम मशिन वापरण्यात आल्या असून, याचा गडकरींना फायदा झाला असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे तत्कालीन नेते मनोहर डबरासे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याने केलेल्या आरोपासंदर्भांत कोणतेही ठोस पुरावे न दिल्याने न्यायालयाने याचिका गुणवत्ताहीन मानून खारीज केली आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे गडकरींना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा - आमदार रोहित पवारांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस ; राम शिंदेंनी दाखल केली होती याचिका