ETV Bharat / state

Nitesh Rane criticizes Sanjay Raut: संजय राऊत क्रांतिवीर नाही, त्यांनी मराठी लोकांची घरे लुटली- नितेश राणेंची टीका - संजय राऊत

संजय राऊत विरोधात पत्राचाळ प्रकरण आहे, कोविड सेंटर घोटाळा प्रकरण आहे, एका महिलेने ही त्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. संजय राऊत यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. कोणत्या केसमध्ये आत जातील, हे येणाऱ्या काळात ठरेल. राऊतने मराठी लोकांची घरे लुटली होती, तो कुठला क्रांतिवीर नाही तर ४२० आहे, अश्या शब्दात नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. मोदी सरकारने ९ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने काही कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आले असून ते नागपूर विमानतळावर बोलत होते.

Nitesh Rane criticizes Sanjay Raut
नितेश राणेंची संजय राऊत यांच्यावर टीका
author img

By

Published : Jun 9, 2023, 2:14 PM IST

Updated : Jun 9, 2023, 3:44 PM IST

संजय राऊतांवर नितेश राणेंची टीका

नागपूर : भाजप नेते आमदार नितेश राणे दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांच्याशी आमचे विचार पटत नसले तरी त्यांना काहीही त्रास होणार नाही, एवढी काळजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. शेवटी हे उद्धव ठाकरेचे सरकार नाही. महाविकास आघाडीचे सरकार नाही. जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते, तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली होती, त्यांना थ्रेट असला तरी सिक्युरिटी काढली होती. तशा गोष्टी आम्ही करणार नाही.

पवारांची काळजी घेण्याची जबाबदारी आमच्या सरकारची आहे. - नितेश राणे

धमकीची गरज नाही : आता मच्छर मारण्यासाठी कोणाला धमकी देण्याची गरज नाही ना. पायाचा बूट हलवला तरी मच्छर मरतो. त्याला धमकी वगैरे काही चालत नाही. दुसरे सुनील राऊत आहे. त्यांना धमकी कोणाकडून आली, हे विचारा, कारण मी ऐकले आहे की मुंबईतील एक डॉ. महिला यांच्यामागे पडली आहे. कारण संजय राऊत हे उथसुठ तिला धमकी द्यायचे. त्या डॉक्टर महिलेकडून तर संजय राऊत यांना धमकी नाही ना? याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावे, असे म्हणत त्यांनी राऊतांवर निशाणा साधला.

नाक्यावर बसून चर्चा : २०२४ ला महाविकस आघाडीचे सरकार येईल तेव्हा भाजप नेत्यांची यादी तयार करा, ज्यांच्या मागे ईडी लावायची आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत आणि विनायक राऊत हे घरात बसून चर्चा करत होते का?? कारण २०२४ ला विनायक राऊत खासदार नसणार आणि संजय राऊत बाहेर नसणार. मग सत्ता कुठून येणार? नाक्यावर बसून चर्चा करू नये.

हेही वाचा :

  1. Nitesh Rane in Nashik : नितेश राणेंनी केली त्र्यंबकराजांची महाआरती, राजकारण पुन्हा तापणार ?
  2. Nitesh Rane On Uddhav Thackeray : दोन हजार रुपयांच्या नोटाबंदीमुळे उद्धव ठाकरेंची चिंता वाढली - नितेश राणे
  3. Serious Allegations Against Thackeray : ठाकरे कुटुंबाकडून वसूल केली जाते खंडणी, भाजपच्या 'या' आमदाराने केला मोठा गौप्यस्फोट

Last Updated : Jun 9, 2023, 3:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.