ETV Bharat / state

Nitesh Rane on Rohit Pawar : नितेश राणेंची जीभ घसरली, रोहित पवारांवर खालच्या पातळीवर टीका

Nitesh Rane on Rohit Pawar : भाजपा आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. रोहित पवार यांनी नागपुरात दौरा केल्यापेक्षा आपल्या कर्जत जामखेड मतदार संघात लक्ष घालावं असंही नितेश राणे यांनी यावेळी सांगितलं.

Nitesh Rane on Rohit Pawar
भाजपा आमदार नितेश राणे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 2:48 PM IST

नागपूर Nitesh Rane on Rohit Pawar : भाजपा आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. रोहित पवार अजून सिनिअर केजीमध्येचं आहेत. त्यांना अद्यापही दाढी मिशी देखील फुटलेली नाही. अजून त्यांना आवाजाचा कंठ फुटलेला नाही. ते पहिल्याचं टर्मचे आमदार असून प्रणिती शिंदे यांनी त्यांच्याबद्दल काय बोललं, याकडं त्यांनी लक्ष घालावं. इतरही काही अर्वाच्य शब्दात भाजपा आमदार नितेश राणे यांनी टीका केली. नागपूर, विदर्भाचे दौरे करण्यापेक्षा रोहित पवारांनी स्वतःच्या कर्जत जामखेडमध्ये लक्ष घालावं, म्हणजे माजी आमदार लिहिण्याची वेळ येणार नाही, असा टोलाही नितेश राणे यांनी रोहित पवार यांना लागावला आहे.

राहुल नार्वेकरांना कुणीही कायदा शिकवू नका : राज्य विधानमंडळातील 16 आमदार अपात्रतेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाप्रमाणेचं सुनावणी होत आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या विषयातील एक्सपर्ट आहेत. त्यामुळे कोणीही त्यांना कायदा शिकवण्याची गरज नाही असं नितेश राणे यांनी म्हटलंय. जेव्हा उशीर होत होता, तेव्हा त्यांच्यावर खालच्या पातळीची टीका ठाकरे गटानं केली. त्यांची उणीदुणी काढली, त्याच राहुल नार्वेकर यांच्यापुढं जाऊन आज बसावं लागत आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून 2024 पर्यंत हे सरकार सक्षम आणि ताकदीनं चालणार असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

जरांगे पाटील अहंकार बाळगणार नाहीत : मनोज जरांगे पाटील हा तळागाळात संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. कुठल्या विषयाचा अहंकार ते करणार नाहीत. समाजाचं हित काय हे मनोज जरांगे पाटलांना चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. सरकार योग्य पद्धतीनं मराठा समाजाला फायदा होईल, त्या गोष्टी करणार असल्याचा विश्वास त्यांना आहे, असंही नितेश राणे यावेळी म्हणाले. समाजाच्या सगळ्या घटकांना हे आपलं सरकार आहे असं मी सांगेन, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवा, असंही नितेश राणे यांनी यावेळी सांगितलं.

संजय राऊतांना आरक्षणाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही : मराठा समाजाचं आरक्षण घालवणारे हे संजय राऊत यांचे मालक आहेत. संजय राऊत हे कोणत्या तोंडानं आरक्षणाबाबत बोलतात, असा सवालही त्यांनी केला. त्यांच्याच मुखपत्रामध्ये मराठ्यांच्या मूकं मोर्चाला मुका मोर्चा असं छापल होतं. त्यामुळे संजय राऊत यांना मराठा समाजाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, असंही नितेश राणे यांनी यावेळी सागंतिलं.

काय आहे पाटणकर काढ्याचा अर्थ : पाटणकर काढ्याचा अर्थ एवढाच आहे की पाटणकर यांच्या नावानं माजी मुख्यमंत्र्यांच्या अवतीभवतीच हे सरकार होतं. ठाकरे सरकार नव्हतं, म्हणून पाटणकर काढा, असंही नितेश राणे यांनी स्पष्ट केलं. ज्या दिवशी उद्धव ठाकरेंना पाटणकर काढा पाजला जाईल, त्या दिवशी उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पण येणार नाहीत, असा हल्लाबोलही नितेश राणे यांनी यावेळी केला.

'इंडिया' आघाडीच्या बैठकीत डीएमकेच्या अभिनंदनचा प्रस्ताव : दिल्लीच्या 'इंडिया' बैठकीत डीएमकेच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आणि ठराव घेतल्याची माहिती मला मिळाल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. जी माहिती आमच्याकडं आली, त्यानुसार डीएमके सातत्यानं सनातन धर्माचा अपमान करत आहे. हिंदू धर्माच्या विरोधात बोलत आहे. त्या डीएमकेवर टीका करण्याऐवजी अभिनंदनाचा प्रस्ताव संमत होत असेल, तर हे 'इंडिया' अलायन्स कशासाठी बनवला, यांचा चेहरा स्पष्ट होत असल्याचा आरोपही नितेश राणे यांनी केला.

हेही वाचा :

  1. Rohit Pawar : कागदावर सह्या केल्या तेव्हा विश्ववास ठेवला अन् नंतर...; रोहित पवारांचा काकांवर हल्लाबोल
  2. मी पण रोज मासे खातो, मग माझे डोळे..., नितेश राणेंचा विजयकुमार गावितांना चिमटा; तर मंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.