ETV Bharat / state

Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरी धमकी प्रकरणाच्या तपासासाठी एनआयएचा विशेष कोर्टात अर्ज - Union Minister Nitin Gadkari

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या धमकी व खंडणी प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए ) आपल्या हाती घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी एनआयएने नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात एक अर्ज दाखल केला आहे. त्या वर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. (Nitin Gadkari Threat Case)

, NIA application in special court
गडकरी धमकी प्रकरणात एनआयएचा विशेष कोर्टात अर्ज
author img

By

Published : Jul 17, 2023, 5:31 PM IST

नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मिळालेल्या धमकी आणि खंडणी प्रकरणात दहशतवादी कनेक्शन उघड झाल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. एनआयएने या प्रकरणाचा तपास सोपावण्यात यावा साठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे.. नागपूर येथील युएपीए विशेष न्यायालयात एनआयएकडून अर्ज दाखल करण्यात आला आहे. नितीन गडकरी धमकी प्रकरणातचा मास्टर माईंड कुख्यात दहशतवादी बशीरुद्दीन नूर अहमदला उर्फ अफसर पाशा आणि जयेश कांथा उर्फ पुजारी सध्या नागपूर पोलिसांच्या कस्टडीत आहेत.

नागपूर पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र : नितीन गडकरी यांना मिळालेल्या धमकी आणि खंडणी प्रकरणात दहशतवादी कनेक्शन समोर आल्यामुळे एनआयएकडे या प्रकरणाचा तपास सोपावण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. याला नागपूर पोलिसांची परवानगी आहे म्हणुन नागपूर पोलिसांनी ना हरकत प्रमाणपत्र दिल्याची माहिती नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. न्यायालयाने परवानगी दिल्यास पुढील काही दिवसात हा तपास एनआयएकडे वर्ग होईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

अफसर पाशाचे नागपूर कनेक्शन : नागपूर पोलिसांकडून अफसर पाशाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीत त्याने धक्कादायक खुलासे करण्यास सुरवात केली आहे. अफसर पाशाचे नागपूर कनेक्शन देखील चौकशी दरम्यान उघड झाले आहे. तो २००३-२००४ मध्ये तो नागपुरात वास्तव्याला होता. चौकशी दरम्यान तो वारंवार उत्तरे बदलत असल्याची माहिती पुढे आली आहे. एन आय ए चे पथक देखील त्याची चौकशी करणार असल्याची शक्यता असून १९ जुलै पर्यंत अफसर पाशाला पोलीस कोठडी मिळाली आहे.

अफसर पाशावर बॉम्बस्फोटाचे आरोप : मास्टर माईंड कुख्यात दहशतवादी बशीरुद्दीन नूर अहमदला उर्फ अफसर पाशा लष्कर ए तोयबा चा कुख्यात दहशतवादी असून २०१४ पासून बेळगावच्या तुरुंगात कैदेत होता. बेळगावच्या तुरुंगातच त्याने जयेश पुजारी उर्फ शाकीरचे ब्रेन वॉश करत त्याचा दहशतवादी नेटवर्कसाठी वापर करून घेतला होता. अफसर पाशावर २००३ मधे ढाका तसेच २००५ च्या बेंगलूरु येथे झालेल्या बॉम्ब स्फोटाचे आरोप आहेत. अफसर पाशानेच जयेशला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून खंडणी मागण्यासाठी प्रवृत्त केल्याचे समोर आले. त्या नुसार त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.

हेही वाचा

  1. Nitin Gadkari Threat Case: नितीन गडकरी धमकी प्रकरण; दहशतवादी अफसर पाशाचे नागपूर कनेक्शन उघड
  2. Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरी यांच्या धमकी प्रकरणातील, अफसर पाशा नागपूर पोलिसांच्या ताब्यात
  3. Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरींच्या धमकीचे धागेदोरे थेट लष्कर-ए-तोयबापर्यंत!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.