ETV Bharat / state

राष्ट्रीय महामार्गांवर रोडावलेली वाहनांच्या संख्येत वाढ; टोल वसुली यंत्रणा पूर्ववत - नागपूर जिल्हा लेटेस्ट न्यूज

नागपूर जिल्ह्याच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास नागपूरला चंद्रपूर, वर्धा, भंडारा आणि अमरावती जिल्ह्यांचा सीमा लागलेल्या आहेत. तर एका बाजूने मध्यप्रदेशची सीमा देखील लागलेली आहे. सर्व महामार्गांवर एनएचएआय म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून टोल नाके लावण्यात आले आहेत. मात्र कोरोनाच्या काळात हे सर्व टोल नाके बंद पडले होते. मात्र आता हळूहळू वाहतुकी संदर्भात परवानग्या मिळू लागल्याने वाहनांची गर्दी सुद्धा वाढायला सुरुवात झाली आहे. बहुतांश लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत.

Toll Collection in nagpur
राष्ट्रीय महामार्गांवर रोडावलेली वाहनांच्या संख्येत वाढ
author img

By

Published : Aug 28, 2020, 12:01 PM IST

नागपूर - कोव्हिड-१९ चा धोका ओळखून केंद्र सरकारने २५ मार्च रोजी संपूर्ण देशभरात टाळेबंदी लागू केली. त्यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आणि एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यास बंदी घालण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रानेच बंदी घातली राष्ट्रीय महमार्गांवरील वर्दळ चक्क दोन टक्क्यांवर येऊन पोहोचली. त्यामुळे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गां प्रमाणेच टोल नाके देखील ओस पडले होते. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असताना महामार्गांवर वाहनांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे टोल वसुसली यंत्रणा आता पूर्ववत झाल्या आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात वाहनांना टोल माफी देण्यात आली. मात्र, महिनाभरानंतर पुन्हा टोल नाके सुरू करण्यात आले होते. त्यामुळे अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी संकटकाळात टोल वसूल करण्यावर नाराजी व्यक्त केली होती. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा आणि आपतकालीन परिस्थितीत परवाना धारक वाहने यांचीच काही ती वरदळ रस्त्यावर दिसून येत होती. त्यामुळे नेहमीच गजबज असणारे आणि वाहनांच्या लांबच लांब रांगानी वाहतूक कोंडीच्या गराड्यातील टोळ नाके लॉकडाऊन काळात ओस पडले होते. तशीच परिस्थिती नागपूर जिल्ह्यातील टोळ नाक्यावर पाहायला मिळत होती. या काळात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आणि संबंधित खासगी ठेकेदारांना फोटा आर्थिक फटका बसला आहे. मात्र आता अनलॉक एक, दोन नंतर टोळनाक्यांची परिस्थिती पूर्व पदावर येतानाचे दृश्य दिसून येत आहे.

गेल्या वर्षीच्या शेवटी म्हणजे डिसेंबर महिन्यात संपूर्ण देशभरात फास्ट-टॅग प्रणाली सुरू करण्यात आली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागण्याचे प्रमाण फारच कमी झाले आहे. विदर्भातील सर्वच टोल नाके सुरू असून प्रत्येक ठिकाणी फास्ट टॅगच्या लेन व्यवस्थित सुरू असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सारख्या समस्या विदर्भात दिसून येत नाहीत. वाहतूक व्यवस्था सुरू झाल्याने जिल्ह्यातील आर्थिक चक्र आता फिरू लागली आहेत. माल वाहतुकीला गती मिळाली आहे.

नागपूर जिल्ह्याच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास नागपूरला चंद्रपूर, वर्धा, भंडारा आणि अमरावती जिल्ह्यांचा सीमा लागलेल्या आहेत. तर एका बाजूने मध्यप्रदेशची सीमा देखील लागलेली आहे. सर्व महामार्गांवर एनएचएआय म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून टोल नाके लावण्यात आले आहेत. मात्र कोरोनाच्या काळात हे सर्व टोल नाके बंद पडले होते. मात्र आता हळूहळू वाहतुकी संदर्भात परवानग्या मिळू लागल्याने वाहनांची गर्दी सुद्धा वाढायला सुरुवात झाली आहे. बहुतांश लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत.

वर्धा जिल्ह्यात ई-पासची सक्ती कायम असल्याने या मार्गावरील वाहनांची संख्या अद्यापही वाढलेली नाही. तर उर्वरित जिल्ह्यात कोणत्याही परवानगी शिवाय जाणे शक्य असल्याने तेथील टोल नाक्यांवर वाहनांची संख्या सुधारते आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव अजूनही कमी झालेला नाही. मार्च महिन्यात कोरोना विषाणूंचा भारतात प्रवेश झाला होता, तेंव्हा पासून देशातील अनेक उद्योग धंद्यांसह अनेक क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. गेल्या पाच देशात महिन्यांपासून हीच परिस्थिती कायम कायम आहे. मात्र आता ज्या प्रमाणे वाहनांचे चाक धाऊ लागले आहेत. त्याच प्रमाणे देशाची अर्थव्यवस्था सुद्धा गती धरेल हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.