नागपूर - राज्य शासनाने मेट्रो सुरू करण्याला हिरवा कंदिल दाखवला. त्यानंतर मुंबईसह इतरही शहरांत मेट्रो सुरू करण्यात आल्या. नागपुरातही सीताबर्डी ते लोकमान्य नगर या मार्गावर मेट्रो धावली. परंतु मेट्रोत प्रवासीच नसल्याचे दिसून आले. त्यामुळे मेट्रोत सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळत आहे. त्यामुळे मेट्रोत सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळत आहे.
हेही वाचा - पूल ओलांडण्याचा जीवघेणा प्रयत्न; ट्रॅक्टर पलटी, एकजण पुरात वाहून गेला
कोरोनामुळे राज्यातील मेट्रो बंद होत्या. त्यानंतर तब्बल सहा महिन्यानंतर आज मेट्रो पुन्हा रुळावर आली. मुंबईसह इतरही शहरांत मेट्रो सुरू करण्यात आल्या. नागपुरातही अनेक महिन्यांपासून थांबलेली मेट्रो आज धावली. परंतु मेट्रोत प्रवासीच नसल्याचे दिसून येत आहे. शिवाय, नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांपर्यंत मेट्रो सुरू झाल्याची बातमी पोहचली नाही की काय, अशीच काहीशी स्थिती पहायला मिळत आहे. त्यामुळे एक-दोन प्रवासी घेऊनच मेट्रो धावत असल्याचे दिसून येत आले.
'नागपूर मेट्रो आजपासून सुरू झाली याचा आनंद वाटतो आहे. सोबतच सुरक्षिततेच्या दृष्टिनेही चांगली खबरदारी घेतली गेली आहे,' अशी प्रतिक्रिया मेट्रोतील प्रवाशांनी दिली आहे. असे असले तरी, एक-दोन प्रवाशांसाठी मेट्रो धावत असल्याने मेट्रोला हा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
हेही वाचा - पंढरपुरात पावसाचा जोर ओसरला, मात्र पूरस्थिती कायम