ETV Bharat / state

'नवजात बाळाला आईकडून कोरोनाचा अत्यल्प धोका'

author img

By

Published : Sep 16, 2020, 3:30 PM IST

'कोरोना रुग्णावर शस्त्रक्रिया' या विषयावर डॉ. वाय. एस. देशपांडे आणि 'गरोदर मातांनी घ्यावयाची काळजी' या विषयावर डॉ. अनुराधा रिधोरकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देत शंकांचे निरसन केले.

कोरोना संवाद
कोरोना संवाद

नागपूर - कोरोनामध्ये गरोदर महिलांना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. योग्य आहार, व्यायाम यासोबतच मास्क, स्वच्छता आणि फिजिकल डिस्टन्सिंग हे सर्व कटाक्षाने पाळावे. प्रसूतीपूर्वी महिलेची कोरोना चाचणी करण्यात येते. चाचणी पॉझिटिव्ह आली तरी घाबरून जाण्याची गरज नाही. योग्य सुरक्षा बाळगून प्रसूती केली जाते. प्रसूतीनंतर मातेने योग्य काळजी घेतल्यास बाळाला कोरोना होण्याचा धोका अत्यल्प आहे, अशी माहिती किंग्ज वे रुग्णालयाच्या वैद्यकीय सल्लागार (सीनियर कन्सल्टंट) प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा रिधोरकर यांनी दिली.

कोरोना संवाद...

नागपूर महानगरपालिकेचे महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून मंगळवारी नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने ‘कोरोना संवाद’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. अनुराधा रिधोरकर आणि प्रसिद्ध शल्यचिकित्सक तथा सिन्हा इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. वाय. एस. देशपांडे यांनी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला.

गरोदर मातांकडून बाळाला कोरोना होण्याचा धोका अत्यंत कमी आहे. सुरूवातीला प्रसूतीनंतर बाळाला आईपासून वेगळे ठेवले जायचे. मात्र, आता बाळाला आईजवळच ठेवले जाते, ते बाळासाठी अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय बाळाला मातेने स्तनपान करणेही बाळाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. स्तनपान करताना आईने मास्क लावणे आवश्यक आहे. कारण कोरोना हा आईच्या दुधातून होत नसला, तरी तो बोलताना तोंड आणि नाकातून पडणाऱया तुषारांमुळे होतो, असे त्यांनी सांगितले.

बाळाला स्तनपान करताना मातेने मास्क लावणे अत्यावश्यकच आहे. याशिवाय सर्व नागरिकांनीही मास्क लावणे गरजेचे आहे. फॅशन म्हणून मास्क वापरू नका, तो गळ्यातला दागिना नाही. आपल्या सुरक्षेचे शस्त्र आहे. त्यामुळे तोंड आणि नाक पूर्ण झाकले जाईल, या पद्धतीनेच मास्क वापरा, असे आवाहनही त्यांनी केले.

कोरोनाबाधित रुग्णांची शस्त्रक्रिया करणे हे अत्यंत धोकादायक आहे. अशा स्थितीत अत्यावश्यक शस्त्रक्रियाच केल्या जातात. उशिरा करता येणाऱ्या शस्त्रक्रिया शक्यतो टाळल्या जात आहेत. शस्त्रक्रिया करताना ऑपरेशन थेटरमध्ये रुग्णाचा डॉक्टर आणि इतर सहायकांशी थेट संपर्क येतो. त्यामुळे डॉक्टरांसह ऑपरेशन थेटरमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना आपले सर्व शरीर सुरक्षित ठेवण्याचे कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे, असे डॉ. देशपांडे यांनी सांगितले.

कोरोना रुग्णांवर शस्त्रक्रिया करताना उपयोगात आणले जाणारे साहित्य, तसेच सुरक्षेच्या सर्व वस्तूंचीही योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही मास्क योग्य प्रकारे लावावा आणि वापरून झाल्यानंतर त्याची योग्य विल्हेवाटही लावावी. रस्त्यावर वा कुठेही मास्क फेकू नका, जबाबदारीने वागा, असेही आवाहन डॉ. देशपांडे यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.