नागपूर : आज हिवाळी अधिवेशनला सुरूवात झाली. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. मात्र राष्ट्रवादीच्या महिला आमदार सरोज अहिरे लहान बाळाला घेऊन विधानसभेत दाखल झाल्या होत्या. एकीकडे लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी तर दुसरीकडे आई म्हणून जबाबदारी निभावताना त्या दिसल्या.
राष्ट्रवादीच्या आमदार सरोज बाबुलाल अहिरे आपल्या नवजात बाळाला घेऊन महाराष्ट्र विधानसभेत पोहोचल्या. त्या 30 सप्टेंबर रोजी आई झाल्या आहेत. आज हिवाळी अधिवेशनात सहभागी झाल्या आहेत. त्या म्हणाल्या, की गेल्या अडीच वर्षांपासून नागपुरात कोवि मुळे एकही सत्र झाले नाही. मी आता आई आहे. पण मी माझ्या मतदारांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आले आहे.