ETV Bharat / state

Nagpur Police on Ajit Parse Arrest : महाठग अजित पारसेला अजूनही अटक नाही, पोलिसांनी दिले 'हे' उत्तर... - Nagpur Police on Ajit Parse Arrest

होमिओपॅथी डॉक्टरला साडेचार कोटी रुपयांनी गंडा (Homeopathy doctor defrauded) घालून फसवणुकीच्या आरोपात अडकलेला महाठग अजित गुणवंत पारसेला अतिशय गंभीर आजाराने ग्रासलेले (Ajit Parse seriously ill)आहे. जोपर्यंत तो पूर्णतः बरा होत नाही तोपर्यंत त्याला अटक केली जाणार नाही असं पोलिसांचे म्हणणे आहे.

Nagpur Police on Ajit Parse Arrest
Nagpur Police on Ajit Parse Arrest
author img

By

Published : Oct 23, 2022, 12:54 PM IST

नागपूर : महाठग अजित पारसेला नागपूर पोलीस बेड्या केव्हा ठोकतील (Ajit Parase Police Arrest) का, असा एक प्रश्न सर्वसामान्य नागपूरकारांच्या मनात घोंघावत आहे. लहान गुन्हा घडला किंवा गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्परतेने कारवाई करणारे नागपूर पोलिसांनी इतक्या संयमाची भूमिका घेण्यामागील कारण काय हा देखील प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. नागपूर शहरातील होमिओपॅथी डॉक्टरला साडेचार कोटी रुपयांनी गंडा (Homeopathy doctor defrauded) घालून फसवणुकीच्या आरोपात अडकलेला महाठग अजित गुणवंत पारसेला अतिशय गंभीर आजाराने ग्रासलेले (Ajit Parse seriously ill)आहे. जोपर्यंत तो पूर्णतः बरा होत नाही तोपर्यंत त्याला अटक केली जाणार नाही असं पोलिसांचे म्हणणे आहे.

असा घडला एकूण घटनाक्रम: होमिओपॅथी डॉक्टरच्या तक्रारीवरून नागपूर पोलिसांनी १२ ऑक्टोबर रोजी अजितच्या निवासस्थानी धाड टाकली होती. त्यावेळी तो गंभीर आजराने ग्रासले असल्याने त्याला अटक करणे शक्य नसल्याने पारसेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चार दिवस उपचार झाल्यानंतर सुट्टी मिळाल्यानंतर घरी परतला. तेव्हा त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले. तिथेसुद्धा अजित पारसेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याची अटक लांबणीवर पडली आहे.

साडेचार कोटींची फसवणूक: नागपूरच्या महाल परिसरातील डॉक्टर राजेश मुरकुटे असे फसवणूक झालेल्या फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादी डॉक्टर मुरकुटे यांची अजित पारसेची २०१९ मध्ये ओळख झाली होती. तेव्हा डॉक्टरने होमिओपॅथी रुग्णालय सुरू करण्याचा मानस असल्याचे अजित पारसेला सांगितले. माझी मुंबई,दिल्लीसह देशातील अनेक राजकीय पक्षातील नेत्यांसोबत जवळचे संबंध असल्याचं सांगून तुम्हाला परवानगी मिळवून देतो असे सांगून स्वतःच्या जाळ्यात ओढले. गेल्या दोन वर्षात अनेक कारणे सांगून आरोपीने डॉक्टरकडून सुमारे साडेचार कोटी रुपये वसूल केले. स्वतःची फसवणूक झाल्याचे समजताच डॉक्टर मुरकुटे यांनी कोतवाली पोलीस अजित पारसे विरुद्ध फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली.

केंद्रीय कार्यालयाचे खोटे लेटरहेड जप्त: डॉक्टर राजेश मुरकुटे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अजित पारसेच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात सीबीआय, पीएमो आणि अनेक केंद्रीय महत्वपूर्ण कार्यालयांसह राजकीय पक्षांच्या नावाचे खोटे लेटरहेड,स्टॅम्प सह अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळल्या आहेत. एवढेच नाही तर अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो त्याच्या घरी मिळून आले आहे.

अनेकांना अडकवले हनीट्रॅपमध्ये: सोशल मीडियाचा इन्फल्यूसर,विश्लेषक आणि तज्ज्ञ म्हणून मिरवणाऱ्या अजित पारसे बड्या शासकीय अधिकाऱ्यांसह शहरातील नामांकित डॉक्टरांना हनीट्रॅपमध्ये अडकवून कोट्यवधी रुपये उकळल्याची माहिती तपासा दरम्यान पुढे आली असल्याचं नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. फसवणूकीची रक्कम सुमारे 25 कोटी रुपये असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. आरोपी अजित पारसे हा अनेकांना दिल्लीतील नेत्यांसोबत ओळख देण्याच्या बहाण्याने दिल्लीत नेत होता. दिल्ली दौऱ्यात तो त्या व्यक्तीची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करायचा. याच दरम्यान ते खोलीत तरुणीला पाठवून तिच्या सोबत अश्लील छायाचित्रे काढायचा. त्यानंतर छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देऊन पारसे यांनी खंडणी वसूल करत होता.

सीबीआय चौकशीची धमकी देऊन पैसे उकळले: अजित पारसेने अनेकांना सीबीआय चौकशीची धमकी देऊन कोट्यवधी रुपये वसूल केल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. माझी पंतप्रधान कार्यालय, सीबीआयमध्ये ओळख आहे. तुमच्या विरुद्ध सीबीआयची गुप्त चौकशी सुरू असून तुम्हाला अटकसुध्दा होऊ शकते अशी भीती दाखवून अजित पारसेने अनेकांना लुटल्याचे पुढे आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.