ETV Bharat / state

नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा फेरविचार करावा; उर्जामंत्री नितीन राऊत यांची विनंती

सर्व ठिकाणी एकाच वेळी लाईट बंद केल्यास सेंट्रल पॉवर ग्रीड फेल झाल्यास ती पूर्ववत होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो,अशा परिस्थितीत रुग्णालयांची देखील वीज जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा काळजीपूर्वक पुनर्विचार करावा, अशी विनंती नितीन राऊत यांनी केली आहे.

narendra modi should take back his decision appeal by nitin raut
नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा फेरविचार करावा; उर्जामंत्री नितीन राऊत यांची विनंती
author img

By

Published : Apr 4, 2020, 9:33 AM IST

Updated : Apr 4, 2020, 11:31 AM IST

नागपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला साथ देत सर्व देशात व महाराष्ट्रात एकाच वेळी लाईट बंद केली तर विजेची मागणी एकदम कमी होईल, ज्यामुळे वीज निर्मिती व पुरवठा यातील गणित बिघडेल त्यामुळे सेंट्रल ग्रीड हाय फ्रिक्वेन्सीवर फेल होण्याची शक्यता वाढेल, अशी भीती महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे. सेंट्रल पॉवर ग्रीड फेल झाल्यास ती पूर्ववत होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो, अशा परिस्थितीत रुग्णालयांची देखील वीज जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा काळजीपूर्वक पुनर्विचार करावा, अशी विनंती नितीन राऊत यांनी केली आहे.

नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा फेरविचार करावा; उर्जामंत्री नितीन राऊत यांची विनंती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आक्षेप घेत नागरिकांनी घरातील लाईट्स बंद न करता दिवे,मेणबत्ती आणि मोबाईल टॉर्च सुरू करावे, असे म्हटले आहे. 5 एप्रिल रोजी म्हणजेच रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी सर्व लाईट्स बंद करून दिवे, मेणबत्ती आणि टॉर्च सुरू करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर यावरून राजकारण सुरू झाले आहे.

अनेकांनी याला मोदींचे इव्हेंट मॅनेजमेंट म्हंटले आहे, तर काहींनी मोदींच्या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला आहे. समर्थक आणि विरोधकांच्या वादात ऊर्जा मंत्रालयाची मात्र वेगळीच अडचण समोर येत आहे.

Last Updated : Apr 4, 2020, 11:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.