नागपूर Nana Patole Reaction : शेड्युल १० प्रमाणे सर्वाधिकार विधानसभा अध्यक्षांचे आहेत, त्यांनी वेळेच्या बंधनात सर्व निर्णय घेणे अपेक्षित होतं. महाराष्ट्राच्या विधिमंडळ कामकाजाचं कौतुक नेहमीच देशपातळीवर केलं जात होतं. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या घाणेरड्या राजकारणमुळेचं आज सर्वोच्च न्यायालयाला देखील विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढावे लागतात. सत्तेतील या लोकांनी विधिमंडळाच्या एकूणचं व्यवस्थेला कलंक लावण्याचं काम केल्याचा आरोप, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते आज नागपूर येथील निवासस्थानी बोलत होते.
इंडिया आघाडीची पहिली जाहीर सभा कुठे : इंडिया आघाडीची (India Aghadi) पहिली जाहीर सभा उपराजधानी नागपुरात होईल अशी चर्चा सुरू आहे. यावर नाना पटोले म्हणाले की, अजून निर्णय झालेला नाही, सध्या आम्ही निवडणुकीच्या कामात गुंतलेलो आहोत, निवडणुकीची प्रक्रिया संपली की त्यानंतर बघू पण सध्या चर्चा नाही.
हे तर जाणीवपूर्वक केलं जातंय : चिडलेला भारतीय जनता पक्षाचा चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय. पाच राज्याच्या निवडणुकांमध्ये त्यांची हार होणार आहे. पंतप्रधानांच्या सभेला लोक जमा होत नाहीत, गृहमंत्री यांच्या सभेकडे लोकांनी पाठ फिरवली. त्यामुळं नॅशनल हेरॉल्डवर कारवाई केली जात आहे. मागच्या काळातही खूप त्रास दिला. गांधी घराण्याची ही काही प्रॉपर्टी नाही, ही देशाची संपत्ती आहे. ही संपत्ती काँग्रेस पक्षाची प्रॉपर्टी आहे, यामध्ये गांधी परिवाराचे पैसे नाहीत.
मुस्लिम धर्मातही मागास जाती : आरक्षण हा मुस्लिम समाजाचा अधिकार आहे. सत्ताधारी जनगणना करत नाही, त्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. मुस्लिम धर्मातही मागास जाती खूप आहेत. हा धर्माचा प्रश्न नाही होऊ शकत नाही, मुस्लिम धर्मातील मागास जाती आहेत त्यांनाही जनगणना करून आरक्षण दिलं पाहिजे. छत्तीसगडमध्ये आदिवासी ओबीसी एससी मध्येही आरक्षणात वाढ करण्यात आली. महाराष्ट्रातही मुस्लिम मागास जाती असतील, त्यामध्ये आरक्षणाची वाढ करण्यात येईल, अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे जुमलेबाजी त्यानी बंद करावी.
मराठा विरुद्ध ओबीसी हे सरकार प्रायोजित : मराठा विरुद्ध ओबीसी भांडण हे सरकार प्रायोजित होऊन घडवत आहे. राज्यातील एक मंत्री एका समूहाबरोबर जाऊन चॅलेंज करत असेल तर लक्षात आलं पाहिजे की हे सरकार प्रायोजित महाराष्ट्राला पेटवण्याचं काम सुरू आहे.
राहुल गांधींनी नाव घेतलं नाही : राहुल गांधींनी (Rahul Gandhi) राजस्थानमध्ये भाषण देताना तरुणांनी आवाज बुलंद केला आणि, सोशल मीडियावर पनौती शब्द प्रचलित झाला. राहुल गांधींनी त्यावेळी जे वक्तव्य केलं आहे, त्यात त्यांनी मोदी यांचं नाव घेतलेलं नाही, असा दावा पटोले यांनी केला.
हेही वाचा -