ETV Bharat / state

नागपूर जिल्हा परिषद निवडणूक अनिल देशमुखसह देवेंद्र फडणवीसांसाठी प्रतिष्ठेची, उद्या मतदान

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पराभवाला सामोरे जावे लागलेल्या भारतीय जनता पक्षाला आता जिल्हा परिषदेत पुन्हा सत्तेत येणे महत्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी जिल्हा परिषदेत देखील सत्ता पालट करणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक
नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक
author img

By

Published : Jan 6, 2020, 7:25 PM IST

Updated : Jan 6, 2020, 9:14 PM IST

नागपूर - महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही भाजपला मोठा फटका बसताना दिसत आहे. त्याच प्रमाणे नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समतीची ही निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये नागपूर जिल्हा परिषदेच्या ५८ आणि पंचायत समितीच्या ११६ जागांसाठी मंगळवारी मतदान होईल. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित गृहमंत्री अनिल देशमुख आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे.

नागपूर जिल्हा परिषद निवडणूक

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पराभवाला सामोरे जावे लागलेल्या भारतीय जनता पक्षाला आता जिल्हा परिषदेत पुन्हा सत्तेत येणे महत्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी जिल्हा परिषदेत देखील सत्ता पालट करणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणावरील काँग्रेस-राष्ट्रवादीची पारंपरिक पकड मोडीत काढत भाजपने १२ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेवर सेनेच्या मदतीने भगवा फडकावला होता. पण विधानसभा निवडणुकीत विदर्भातील लोकांनी भाजपला नाकारले. सहापैकी फक्त दोन जागा भाजपच्या हाती लागल्या आहेत. त्यातच महाविकास आघाडीने राज्यात सत्ता स्थापन करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले आहे. त्यामुळे सत्तेत सहभागी नसल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही निराशा पाहायला मिळत आहे.

बावनकुळे यांना विधानसभेत उमेदवारी नाकारल्याने निर्माण झालेली नाराजी अद्यापही कायम आहे. कामठीचे आमदार टेकचंद सावरकर हे पूर्वी जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांच्या पत्नी निशा सावरकर या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. आता महाविकास आघाडीच्या जोरावर काँग्रेस राष्ट्रवादी जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी पराकाष्टा करत आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक अटीतटीची आणि तितकीच प्रतिष्ठेची झालेली आहे.

प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांसोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील मैदानात उतरले आहेत. सावनेर आणि काटोलच्या ग्रामीण भागात आघाडीची चांगली पकड आहे. तसेच काटोलचे आमदार देखील आता गृहमंत्री असल्याने महाविकास आघाडीसाठी जमेची बाजू ठरत आहे.

Intro:नागपूर

जिल्ह्यापरिषद निवडणूक अनिल देशमुख आणि देवेन्द्र फडणविसांसाठी प्रतिष्टेची

नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समती साठी निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी चे नवनिर्वाचित गृहमंत्री अनिल देशमुख आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या साठी ही प्रतिष्टेची लढत आहे.विधानसभा निवडणुकीत जिल्ह्य़ात झालेल्या दणदणीत पराभवाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषदेत पुन्हा सत्तेत येण महत्वाचं ठरेल तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे काँग्रेस-राष्ट्रवादि आघाडी जिल्हा परिषदेत देखील सत्ता पालट करते काय हे बघणं उत्सुक्याच ठरेल.नागपूर जिल्हा परिषदेच्या ५८ आणि पंचायत समितीच्या ११६ जागांसाठी उद्या मतदान होनार आहे. Body:जिल्ह्य़ाच्या ग्रामीण राजकारणावरील काँग्रेस-राष्ट्रवादीची पारंपरिक पकड मोडीत काढत भाजपने १२ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेवर सेनेच्या मदतीने भगवा फडकावला होता. पण विधानसभा निवडणुकीत विदर्भातील लोकांनी भाजपला नाकारले. सहापैकी फक्त दोन जागा भाजपला मिळाल्या.
राज्यात सत्ता नसल्याने कार्यकर्त्यांत निराशा आहे. बावनकुळे यांना विधानसभेत उमेदवारी नाकारल्याने निर्माण झालेली नाराजी अद्यापही कायम आहे.कामठीचे आमदार टेकचंद सावरकर हे पूर्वी जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांच्या पत्नी निशा सावरकर या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या.मुळे भाजप साठी अटीतटिची आणि तितकीच प्रतिष्टेची लढत आहे Conclusion:प्रचारा साठी देवेंद्र फडणविसांसोबतच नितीन गडकरी देखील मैदानात होते. सावनेर आणि काटोल च्या ग्रामीण भागात आघाडी ची चांगली पकड आहे. सत्तेतील मंत्री देखील काटोल चे आहेत.
या सगळया मध्ये भिन्न विचारसरणी च्या पक्षा सोबत सत्तेत असलेली शिवसेना विदर्भात आपली पाळे मुळे पासरविण्यात किती यशस्वी होते हे जिल्हा परिषदेच्या निकालातून समजेल

बाईट- भुपेंद्र गणवीर, राजकीय विश्लेषक
Last Updated : Jan 6, 2020, 9:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.