नागपूर : नागपूर विद्यापीठाच्या नावाने बोगस पदव्या तयार करुन दिल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या बोगस पदव्याच्या आधारे परदेशात नोकऱ्या मिळवल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराकमधील भारताच्या दुतावासाने नागपूर विद्यापीठाला संपर्क साधला तेव्हा हा गैरप्रकार समोर आला. दुतावासाने बोगस पदवी असलेल्या 27 जणांची यादी नागपूर विद्यापीठाकडे पाठवली आहे. विद्यापीठाने ही यादी तपासली असून हे 27 जण विद्यापीठाचे विद्यार्थी नसल्याचे समोर आहे.
विद्यापीठाने माहिती केंद्राला कळवली - नागपूर विद्यापीठाने संपूर्ण प्रकरणाची माहिती केंद्र सरकारचा शिक्षण विभाग, परराष्ट्र मंत्रायल, गृहविभाग व विद्यापीठ अनुदान आयोगाला कळवली आहे. या प्रकरणी विद्यापीठाकडून अद्याप पोलीस तक्रार देण्यात आलेली नाही. मात्र, नागपूर विद्यापीठाने इराक दूतावासाला या सर्व २७ डिग्री बोगस असल्याचे सांगितले आहे.
कोरोना काळात तयार केल्या पदव्या: इराकमधील भारतीय दुतावासाने नागपूर विद्यापीठाला याविषयी माहिती दिल्यानंतर बनावट पदव्यांचे प्रकरण समोर आले. दुतावासाने पाठवलेल्या बनावट पदव्याच्या यादीत 27 पदव्याचे माहिती दिली आहे. नागपूर विद्यापीठाणे संपूर्ण यादी तपासली तेव्हा २७ पैकी एकही जण नागपूर विद्यापीठ हद्दीतील कुठल्याही महाविद्यालयात शिकलेला नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान या बनावट डिग्री तयार करणाऱ्यांनी नागपूर विद्यापीठाचा लोगो आणि कुलगुरूंची खोटी सह्या वापरून या बोगस पदव्या तयार केल्या होत्या. या २७ पदव्यांपैकी २४ फार्मसी, २ अभियांत्रिकी आणि १ मायक्रोबायोलॉजीच्या आहेत. विशेष म्हणजे या पदव्या २०१७,२०१९ आणि २०२० या वर्षातील आहेत. २०१९ ते २०२० हा कोरोना काळ होता.
आतापर्यंत 27 प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणाचा इराक दुतावासामार्फत उलगडा झाला आहे. या बोगस डिग्रीच्या आधारे अनेक विद्यार्थ्यांनी इराकमध्ये नोकऱ्यासुद्धा मिळवल्या आहेत. त्यावेळी इराक सरकारने या सर्व कागदपत्रांची तपासणी सुरू केली असता या सर्व डिग्री फेक असल्याची शक्यता त्यांना आली होती. यानंतर याप्रकरणाची विद्यापीठाकडे विचारणा झाली. यानंतर या डिग्री फेक असल्याचे समोर आले आहे - डॉ. संजय कवीश्वर, अधिष्ठाता, नागपूर विद्यापीठ
बोगस लाभार्थी इराकचे ? : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठच्या नावावर बोगस पदव्या तयार कुणी केल्या याचा तपास केला जाणार आहे. याचा तपास करण्यासाठी नागपूर विद्यापीठाकडून पोलीस तक्रार करण्याच्या संदर्भात लवकर कारवाई केली जाणार आहे. ज्या २७ तरुणांचे नाव इराक दूतावासाने दिले आहे नावावरून सकृत दर्शनी ते सर्व इराकचे रहिवाशी असल्याचे दिसत आहेत. दरम्यान नागपूर विद्यापीठाने अद्याप पोलीस तक्रार केलेली नाही.
हेही वाचा -