ETV Bharat / state

बेडच्या संख्येमध्ये नागपूर राज्यात अव्वल; मुंबई, पुणे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर - नागपूर कोरोना बातम्या

नागपूरमध्ये आरोग्य यंत्रणा बळकट करताना युद्धपातळीवर प्रयत्न करून बेडची संख्या वाढवण्यात आली. ही संख्या इतर महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांत 10 लाख लोकसंख्ये मागे असणारा निकषानुसार सर्वाधिक असल्याने महाराष्ट्रात नागपूर जिल्हा अव्वल असून मुंबई, पुणे या जिल्ह्यांना मागे टाकले आहे.

Nagpur tops in number of beds  in maharashtra
बेडसंख्येमध्ये नागपूर राज्यात अव्वल
author img

By

Published : May 13, 2021, 1:25 AM IST

नागपूर - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उपराजधानी नागपूरात बेड मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला होता. आरोग्य यंत्रणा बळकट करताना युद्धपातळीवर प्रयत्न करून बेडची संख्या वाढवण्यात आली. ही संख्या इतर महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांत 10 लाख लोकसंख्ये मागे असणारा निकषानुसार सर्वाधिक असल्याने महाराष्ट्रात नागपूर जिल्हा अव्वल असून मुंबई, पुणे आणि सांगली या जिल्ह्यांना मागे टाकले असल्याचा दावा नागपूर महापालिकेतर्फे करण्यात आला.

बेडची संख्या वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असताना आरोग्य यंत्रणा बळकट करण्याकडे भर देण्यात आला. या काळात ऑक्सिजन बेड असो की व्हेंटिलेटरवर की साधे बेड वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. यात नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या ४६ लाखांच्या त्यापैकी यात शहराची लोकसंख्या २३ लाखांच्या घरात आहे. नागपूर जिल्हाच नव्हे, तर नजिकच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड सीमेवरील शहरांतील नागरिकही नागपूरात उपचाराचा लाभ घेत आहे.

बेडसह ऑक्सिजन प्लांटची व्यवस्था -

या काळात शहरातील आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाचे प्रयत्न पालिका पदाधिकारी आणि प्रशासनाने सुरू केले. महापौर दयाशंकर तिवारी, आयुक्त राधाकृष्णन बी. आणि जिल्हाधिकारी रविन्द्र ठाकरे यांच्या नेतृत्वात रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटची व्यवस्था करण्यासोबतच बेड्‌सची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री नितीन राऊत, विरोधीपक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांच्या पुढाकारातून व्हेंटिलेटरसह अन्य आरोग्य उपकरणांची व्यवस्था करण्यात आली. परिणामी सध्या नागपूर जिल्ह्यात साधारण बेडस ऑक्सिजन 16632 आहेत. 9444 ऑक्सिजन बेड, 2808 आयसीयू बेड्‌, 996 व्हेंटिलेटर बेड्‌स उपलब्ध आहे.

जिल्ह्यात प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे 3616 बेड्‌स उपलब्ध -

नागपूर शहर आणि जिल्ह्याची लोकसंख्या ४.६ दशलक्ष आहे. त्यामुळे सध्या नागपूर जिल्ह्यात प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे 3616 बेड्‌स उपलब्ध आहेत. यामध्ये प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे 2162 ऑक्सिजन बेड्‌स, 610 आयसीयू बेड, तर 217 आयसीयू व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता आहे. ही संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली. कोरोनाच्या पाहिल्या लाटेत 2020 मध्ये फक्त 66 खाजगी रुग्णालय होते. ही संख्या मार्च अखेरपर्यंत 88 होती. यामध्ये वाढ करुन एप्रिलमध्ये 108 पर्यंत नेण्यात आली असून एप्रिलअखेर पर्यंत 146 रुग्णालय कोविड रुग्णलाय झाले असून बेडची संख्याही त्या सोबत वाढत गेली.

प्रति दशलक्ष लोकसंख्येमध्ये सर्वाधिक बेड्‌स -

अनु.क्र.जिल्ह्याचे नावलोकसंख्या (दशलक्षमध्ये) ऑक्सिजन बेड्‌स आय.सी.यू. बेड्‌सव्हेंटिलेटर बेड्‌स
१.नागपूर ४.६ २१६२ ६१० २१७
२.मुंबई ३.११३२५ ३३२ १८६
३.पुणे ९.४ ११९२४०६१५८
४. सांगली २.८११८५३४५ १२४
५.मुंबई उपनगर९.६ १०२२२१४१०९

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.